वृत्तसंस्था
पुणे : औद्योगिक वसाहत चाकण परिसरातील म्हाळुंगे येथे कंपनीत पाणीपुरवठ्याच्या वादातून एक तरुणाची हत्या करण्यात आली. Murder of a young man over a water supply dispute
अतुल तानाजी भोसले, असे हत्या झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले आहे. सीसीटीव्हीत हत्येची घटना कैद झाली आहे.
अतुल भोसले हा म्हाळुंगे परिसरातील एका कंपनीत दोन टँकरने पाणीपुरवठा करत होता. दरम्यान,आरोपी अक्षय शिवले याने अतुल भोसले याला फोन करून मला त्या ठिकाणी पाणीपुरवठा करायचा आहे, असे सांगितले. यावरून त्यांच्यात फोनवरच वाद झाला होता, अशी माहिती पोलिस अधिकारी अरविंद पवार यांनी दिली.
त्यानंतर म्हाळुंगे येथील ममता स्वीट दुकानासमोर अतुल भोसले याला गाठले व साथीदारांच्या मदतीने कोयत्याने वार केले. अतुल रक्ताच्या थारोळ्यात पडला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली.
दोन जणांना ताब्यात घेतले असून अक्षय शिवले, गणेश ढरमाळे, गोट्या भालेराव आणि इतर तीन साथीदार यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App