
शेतकरी आंदोलनाचा फायदा अनेकांना उचलायचा आहे आणि ते त्यात अडथळे आणत आहेत. ते शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. यात त्यांचा स्वार्थही असू शकतो, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपाचे गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी केली आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : शेतकरी आंदोलनाचा फायदा अनेकांना उचलायचा आहे आणि ते त्यात अडथळे आणत आहेत. ते शेतकऱ्यांचा अजिबात विचार करत नाहीत. यात त्यांचा स्वार्थही असू शकतो, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते आणि भाजपाचे गुरुदासपूरचे खासदार सनी देओल यांनी केली आहे. sunny deol farmers protest
खासदार देओल म्हणाले की, संपूर्ण जगाला माझी विनंती आहे, हा मुद्दा शेतकरी आणि आपल्या सरकारमधील आहे. यामध्ये कोणी पडू नये. कारण आपापसातील चर्चेतून यावर आम्ही तोडगा काढू. दीप सिध्दू विषयी बोलताना देओल म्हणाले, निवडणुकीच्या वेळी दीप सिद्धू माझ्यासोबत होता. आता बराच कालावधीपासून सोबत नाहीए. तो जे काही बोलतोय आणि करतोय ते त्याच्या इच्छेनुसार करतोय. त्याच्या कोणत्याही उपक्रमांशी माझा संबंध नाही. मी माझा पक्ष आणि शेतकऱ्यांसोबत आहे आणि नेहमीच शेतकऱ्यांच्यासोबत राहणार.
आमच्या सरकारने नेहमीच शेतकऱ्यांच्या भल्याच्या विचार केला आहे आणि सरकार त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णयावर येईल याची मला खात्री आहे, असं सनी देओल म्हणाले.
sunny deol farmers protest
केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी म्हटले आहे की, कृषी कायद्यांविरोधात विरोधक शेतकऱ्यांना चिथावत असल्याचा आरोप केला आहे. या मुद्द्यावरून राजकारण कसे केले जातेय हे शेतकऱ्यांनी समजून घेतले पाहिजे आणि राजकीय लाभासाठी काम करणाऱ्यांना शेतकऱ्यांना बळी पडू नये. कृषी मालासाठी किमान आधारभूत किंमत (एमएसपी) सुरूच आहे आणि राहील, हे सरकारने स्पष्ट केलं आहे. आम्ही शेतकऱ्यांना हे लेखीही देऊ शकतो. पण काँग्रेस शासित राज्य सरकारे आणि विरोधी पक्ष शेतकऱ्यांना भडकवत आहेत. देशातील शेतकरी या कायद्यांच्या बाजूने आहेत. पण काही लोक त्यांना चिथावत आहेत. मला खात्री आहे की देशातील शेतकरी असे काहीही करणार नाहीत, ज्यामुळे देशाची शांती धोक्यात येईल. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळाले आहे.
Array