ठाकरे – पवार सरकारला वेळ देत संभाजीराजेंची मराठा मूक आंदोलन महिनाभरासाठी स्थगितीची घोषणा


प्रतिनिधी

नाशिक – मराठा समाजाच्या मागण्या ठाकरे – पवार सरकारने मान्य केल्या. त्यांच्या अंमलबजावणीसाठी त्यांना वेळ मिळावा म्हणून खासदार संभाजीराजे यांनी मराठा मूक आंदोलन एक महिनाभरासाठी स्थगित केले आहे. MP sambhaji raje announced to stall maratha agitation for one month

खासदार संभाजीराजे यांनी आज सकाळी नाशिकमध्ये मूक आंदोलन केले. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत मूक आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली. पत्रकार परिषदेत बोलताना खासदार संभाजीराजे म्हणाले, ‘राज्य सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून या मागण्याची अंमलबजावणी करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागेल असे सरकारचे म्हणणे आहे. या मागण्यांची प्रशासकीय स्तरावर अंमलबजावणी होत आहे. मात्र असे असले तरी राज्यातील मराठा मूक आंदोलनाच्या समन्वयकांनी हे आंदोलन थांबवायचे नाही, असे निर्धार केला आहे. म्हणूनच आम्ही आमचे आंदोलन तूर्तास १ महिन्याभरासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता सरकारने महिन्याभरात आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करावी. जर सरकारने मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर मात्र आम्ही आमच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवू असेही खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.

राष्ट्रीय राजकारणात ज्येष्ठ नेते शरद पवार मोठी भूमिका घेऊन उभे राहात आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील त्यांच्या मार्गदर्शनाखालील सरकारला कोणता अडथळा नको म्हणून तर संभाजीराजे यांनी मराठा मूक आंदोलन स्थगित केले नाही ना, अशी शंका देखील राजकीय वर्तुळात उपस्थित केली जाऊ लागली आहे.

आजच्या आंदोलनात नाशिक शहरातील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. त्याच बरोबर मराठा विद्या प्रसारकच्या सरचिटणीस निलिमाताई पवार या देखील उपस्थित होत्या. त्या माजी खासदार दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांच्या पत्नी आहेत. त्यांच्या उपस्थितीलाही राजकीय महत्त्व आहे.

MP sambhaji raje announced to stall maratha agitation for one month

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात