विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्यप्रदेशात सुधारित कृषी कायद्याचे फायदे दिसू लागले आहेत. शेतकरी आता कृषी उत्पन्न बाजार समिती बाहेर माल विकून झटपट पैसेही मिळवू लागले आहेत. कृषी कायद्यानुसार शेतकरी त्यांचा माल बाजार समिती आणि समितीबाहेर विकू शकतो. MP farmers getting benefit of MSP and new farm laws
मध्यप्रदेशात अनेक शेतकऱ्यांनी त्यांचा माल बाजार समितीबाहेर त्यांना हव्या त्या किंमतीत विकला. त्यामुळे बाजार समितीत 21 टक्के माल कमी आल्याचे सांगण्यात आले.
कायदा लागू होण्यापूर्वी माल केवळ बाजार समितीतच विकावा हे बंधन होते. त्यामुळे शेतकऱ्यांची घुसमट होत होती. समिती ठरवेल ती किंमत मिळत होती. आता शेतकरी त्याचा माल समितीबाहेर कोणत्याही व्यापाऱ्याला त्याला हव्या असलेल्या किंमतीला विकण्यास मोकळा झाला आहे. ही परिस्थिती मध्यप्रदेशात सध्या आहे. त्यामुळे टाक शेतमाल आणि घे झटपट पैसा, या कृतीमुळे शेतकऱ्याला चांगले दिवस आले आहेत.
शेतकरी म्हणाले, शेतमाल बाजार समितीबाहेर विकल्यावर लगेच पैसे मिळतात. त्यामुळे समितीत आता जाण्याची गरजच उरली नाही. शेतमाल विकताना पूर्वी अडचणी येत होत्या. त्या आता दूर झाल्या आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App