विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परराष्ट्र धोरणावर टीका करणारे राजकीय विश्लेषक आणि परराष्ट्र सेवेतील माजी वरिष्ठ अधिकारी हे चीनला पाहिजे असणारे नॅरेटिव्हच चालवत आहेत. चीन जगात स्वतःची जागतिक व्यवस्था आणू पाहतोय, त्याला पुष्टी देणाराच युक्तिवाद मोदींचे टीकाकार करीत आहेत, अशी घणाघाती टीका भारतीय राजदूतांच्या फोरमने केली आहे. Modi oppnents dirves the chinese narrative in their criticisam of foreign policy
इंडियन एक्सप्रेसमध्ये लेख लिहून कंवल सिब्बल, श्यामला कौशिक, वीणा सिकरी, भाषावती मुखर्जी या राजदूतांनी मोदींच्या परराष्ट्र धोरणावरील टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे.
भारताला जगातली अधिमान्यता असलेली शक्ती नक्की बनायचे आहे. पण भारताने आपण विश्वगुरू असल्याचा दावा कधीही केलेला नाही. पाश्चात्य जग स्वतःला विश्वगुरू समजून जगाला मूल्य शिकवण देत बसते, तसे भारताने कधीही केलेले नाही. चीन भूतकाळातील स्वतःवर झालेल्या अवमानाचा बदला घेण्याची भाषा करतो. भारताने असे कधी केले आहे?? तरीही भारतातलेच विश्लेषक पाश्चात्य माध्यमांमध्ये भारताच्या तथाकथित विश्वगुरूत्वाच्या दाव्याबद्दल हिणकस भाषा वापरून लिहितात, तेव्हा त्यांना काय म्हणायचे?? हा प्रश्न पडतो.
हे विश्लेषक आणि परराष्ट्र सेवेतले माजी अधिकारी चीनला पाहिजे असलेलाच नॅरेटिव्ह चालवत असल्याचे स्पष्ट दिसते. डोकलामच्या मुद्द्यावर भारताने कधीच अधिकृतपणे आपला विजय झाल्याचा दावा केला नाही. तरीही भारताच्या भूमिकेवर आपलेच लोक शंका व्यक्त करतात. हेच तर चीनला हवे आहे. चीनचा विस्तारवाद वाढतो आहे. तो आपल्या शेजारच्या देशांबाबत जसा दिसतो, तसा तो हिंदी महासागरातही दिसतो. आग्नेय आशियात दिसतो. भारताने त्याचा प्रतिकार करायचा नाही का?? आग्नेय आशियातले छोटे देशही चीनविरोधात आवाज उठवितात. मग भारताने त्यांच्या पाठीशी उभे राहायचे नाही का?? भारताची लूक इस्ट पॉलिसी मोदींनी अँक्ट इस्ट पॉलिसीत बदलली हे भारताचे यश मानायचे की नाही??,असा परखड सवालही राजदूतांच्या फोरमने उपस्थित केला आहे.
चीनशी परराष्ट्र धोरण ठरवताना व्यापार आणि संरक्षण ही दोन्ही क्षेत्रे वेगळी ठेवली पाहिजेत, असे विश्लेषकांचे मत आहे. चीनच्या वस्तू भारतीय बाजारात स्वस्त पडतात, असा त्यांचा दावा आहे. नेमका हाच तर चीनचा अधिकृत युक्तिवाद आहे. व्यापार आणि संरक्षण या दोन भिन्न बाबी आहेत, अशी भूमिका चीन भारताबरोबरच्या आणि अन्य देशांबरोबरच्या वाटाघाटींमध्ये घेत असते. म्हणजे चीनला सुखनैव स्वतःच्या अटीशर्तींवर व्यापार करू द्यावा. स्वतःची अर्थव्यवस्था जगाच्या बळावर मजबूत करू द्यावी आणि मग चीन जागतिक व्यवस्थेला आपल्याला हवे तसे वळण लावणार. भारताने त्याला मान्यता द्यावी, ही चीनची भूमिका राहिलेली आहे. आणि याच भूमिकेची री आपले विश्लेषक ओढताना दिसतात, अशी परखड टीका राजदूतांच्या फोरमने केली आहे.
चीनचे धोरण लांडग्याने लचके तोडावे असे आहे. ते देशाअंतर्गत आपल्याच जनतेवर अत्याचार करतात. राष्ट्रपती क्षी जिंगपिंग हे स्वतःच्या सत्तेची मूळे घट्ट करताना दिसतात. आणि दुसरीकडे चीन दुसऱ्या देशांमधल्या फुटीरतावादी चळवळींना हात देताना दिसतो.
भारत हा चीन विरोधात डोळ्या डोळा भिडवून उभा राहिला की इकडे मोदीविरोधक त्या रागातून परराष्ट्र धोरणाविरोधात लिहितात आणि युक्तिवाद करतात. पण त्यामध्ये धोरणाच्या चिकीत्सेपेक्षा मोदींचा वैयक्तिक विरोध आणि सत्ताधारी पक्षाच्या राजकीय तत्त्वप्रणालीचा विरोध अधिक असतो, असे परखड मत राजदूतांनी व्यक्त केले आहे.
माजी राजदूतांच्या या फोरमध्ये सर्वश्री सी. एम. भंडारी, पिनाक रंजन चक्रवर्ती, सतीश चंद्रा, श्यामला बी. कौशिक, निरंजन देसाई, गौरी शंकर गुप्ता, ओ. पी. गुप्ता, वीरेंद्र गुप्ता, योगेश गुप्ता, जी. एस. अय्यर, दिनेश जैन, पी. के. कपूर, अशोक कुमार, मोहन कुमार, म्हैसूर लोकेश, भाषवती मुखर्जी, ओम प्रकाश, लक्ष्मी पुरी, मनजीव पुरी, अशोक सज्जनहार, जगजीत साप्रा, प्रकाश शहा, एन. पी. शर्मा, बालकृष्ण शेट्टी, कंवल सिब्बल, वीणा सिकरी, अजय स्वरूप, अनिल त्रिगुणायत, जे. के. त्रिपाठी, बी. बी. त्यागी, मित्रा वसिष्ठ, विजय सागर वर्मा, दीपक व्होरा यांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App