औरंगाबादचे नामांतर केल्यास रस्त्यावर उतरू, रामदास आठवले यांचा इशारा

औरंगाबादचे नामांतर करण्यास रिपब्लिकन पक्षाने विरोध केला असून राज्य सरकारने शहराचे नाव बदलल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे. If Aurangabad is renamed, we will on the streets, warns Ramdas Athavale


विशेष प्रतिनिधी

औरंगाबाद : औरंगाबादचे नामांतर करण्यास रिपब्लिकन पक्षाने विरोध केला असून राज्य सरकारने शहराचे नाव बदलल्यास रिपब्लिकन पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा केंद्रीय समाजकल्याण राज्य मंत्री रामदास आठवले यांनी दिला आहे.

महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शिवसेना, भाजप व मनसेसह काही पक्षांनी नामांतराची मागणी केली आहे. मात्र, कॉंग्रेसपाठोपाठ आता रिपाईंचे नेते रामदास आठवले यांनी कडाडून विरोध दर्शवला आहे.औरंगाबाद शहराचे नाव बदलून संभाजीनगर करावे, अशी मागणी शिवसेना अनेक वर्षांपासून करीत आहे. काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादकडे जाणाऱ्या एसटी बसवर संभाजीनगर असे फलकही लावले होते. त्यामुळे औरंगाबादचे नामांतर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काँग्रेसने नामांतराला विरोध केला आहे. त्याचबरोबर भाजपचा घटक पक्ष असलेल्या रिपाईने यास विरोध केला आहे.

If Aurangabad is renamed, we will on the streets, warns Ramdas Athavale

कॉंग्रेसच्या नेत्यांनीही औरंगाबादच्या नामांतरास विरोध केला आहे. नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत की नामांतराचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या समितीसमोर आल्यानंतर त्याला कॉंग्रेसचा विरोध असेल. किमान समान कार्यक्रमामध्ये नामांतरासारख्या बाबीचा समावेश नाही. उत्तर प्रदेशात काही शहरांची नावे बदलली गेली, मात्र यामुळे काही फरक पडला का? निवडणूक आली की लोकांच्या भावनेच्या मुद्यावर राजकारण करायचं काम काहीजण करत असतात, असे कॉँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*