प्रतिनिधी
सोलापूर – लवणातला ससा आणि नशिबातलं पोरगं, असल्या शेलक्या मराठी म्हणी वापरून भाजपचे आमदार गोपीचंद पडळकरांनी शरद पवारांवर तिरंदाजी केली आहे. सोलापूरमध्ये ते पत्रकारांशी बोलत होते. MLC gopichand padalkar targets sharad pawar over OBC reservation
ओबीसी आरक्षणावरून बोलताना पडळकरांनी पवार काका – पुतण्यांवर निशाणा साधला. खासदार अमोल कोल्हे किंवा धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीने प्रदेशाध्यक्ष केले नाही. त्यांना ओबीसी नेते त्यासाठी सापडत नाहीत, असे टीकास्त्र पडळकर यांनी सोडले.
शेलक्या मराठी म्हणी वापरून पडळकरांनी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीची खिल्ली उडविली. ते म्हणाले, की दिल्लीत शरद पवार यांच्या पुढाकाराने झालेली राष्ट्र मंचाची किंवा तिसऱ्या आघाडीची बैठक म्हणजे ‘रात गेली हिशोबात, पोरगं नाही नशिबात’ अशातला प्रकार आहे. मी लहान असल्यापासून शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी माझ्या शुभेच्छा आहेत. पुढं कुठल्यातरी लवणात ससा सापडेल अशी त्यांची अपेक्षा आहे, असा टोलाही पडळकर यांनी पवारांना लगावला.
शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. ते मोठे नेते आहेत हे मी मानत नाही, तुम्ही कोणी तसं मानत असाल तर तो तुमचा प्रश्न आहे, अशी टीकाही पडळकरांनी केली.
ओबीसींचा इम्पिरिकल डाटा सादर करण्यास सुप्रिम कोर्टाने ठाकरे – पवार सरकारला सांगितले होते, मात्र राज्य सरकारने ते केले नाही. कारण राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा डीएनए बहुजन विरोधी आहे. म्हणूनच काँग्रेसच्या नेत्याच्या मुलाने ओबीसी आरक्षणाच्या विरोधात कोर्टात याचिका दाखल केली, याची आठवण पडळकरांनी करून दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App