Satish Chavan : आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून हकालपट्टी

Satish Chavan

विशेष प्रतिनिधी

Satish Chavan  गंगापूर विधानसभा मतदारसंघाच्या आखाड्यात उतरण्याची इच्छा असणारे मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांची राष्ट्रवादी अजित पवार गटातून हकालपट्टी झाली आहे.Satish Chavan

जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे आणि पक्षशिस्त मोडल्याबद्दल आमदार सतीश चव्हाण यांना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी दिली आहे.

१५ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुती सरकारच्या विरोधात प्रतिमा मलिन करण्याच्या हेतूने जाणीवपूर्वक पक्षविरोधी भूमिका छत्रपती संभाजीनगरचे आमदार सतीश चव्हाण यांनी घेतली होती. वास्तविक सर्व समाजघटकांना न्याय देण्याची भूमिका महायुती सरकारच्या कार्यकाळात घेतलेली आहे, असे त्यांनी सांगितले.



राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर अजित पवारांसोबत गेलेले मराठवाडा पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांनी एक पत्र लिहिले होते. ‘बहुजनांचे प्रश्न सुटतील, या उद्देशाने आम्ही महायुती सरकारमध्ये सहभागी झालो. मराठा, धनगर, ओबीसी, आदिवासी, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार मार्ग काढेल अशी अपेक्षा होती. मात्र सरकार यावर मार्ग काढू शकले नाही, बहुजनांचे प्रश्न सोडवू शकले नाही’, अशी खंत चव्हाण यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केली. त्याची राष्ट्रवादीने दखल घेतली आहे.

आमदार सतीश चव्हाण संस्थाचालक असून अजितदादांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांना गंगापूरमधून निवडणूक लढवायची आहे. पण तिथे भाजपचे आमदार प्रशांत बंब आहेत. त्यामुळे युतीतून चव्हाणांना तिकीट मिळू शकत नाही. त्यामुळे चव्हाण हे शरद पवार गटात जाऊन तिकीट घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. गेली अनेक दिवस आपल्या आमदार निधीतून ते या मतदारसंघात कामे करत आहेत. गाव भेटीदेखील करत असल्याचे दिसून येत आहे.

“MLA Satish Chavan Expelled from Ajit Pawar-led NCP Faction”

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात