वृत्तसंस्था
नवी दिल्ली – महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये डेल्टा वेरिएंटचे रुग्ण आढळले असताना निर्बंध पुन्हा लावण्याची घोषणा झालेली आहे. पण या डेल्टा वेरिएंटशी लढा देण्यासाठी आपल्याकडे प्रभावी उपाययोजना आहेत, असे एम्सचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी स्पष्ट केले आहे. “Mixing Vaccines May Improve Immunity, But Need More Data”: AIIMS Chief
डेल्टा प्लस आणि डेल्टासारख्या जास्त संसर्गजन्य आजाराशी दोन वेगवेगळ्या कोरोना प्रतिबंधक लसी एकत्र करून लढणे शक्य आहे. पण दोन कोरोना लसी एकत्र देण्यासाठी अधिक डेटाची गरज आहे. पर्याय म्हणून दोन कोरोना वेगवेगळ्या कोरोना लसी एकाच वेळी देता येऊ शकतात. पण चांगल्या परिणामासाठी कोणत्या दोन लसी द्यायला हव्यात याचा अधिक अभ्यास करण्याची गरज आहे. यामुळे कोरोना लसीचा प्रभाव वाढेल, असे डॉ. गुलेरिया म्हटले
कोरोना प्रतिबंधक लसीकरण योजनेचा भाग म्हणून तज्ज्ञ दोन कोरोना लसी एकत्र दिल्याने काय परिणाम होऊ शकतो, त्याची परिणामकता वाढते का. याचा अभ्यास करणार आहे. असे गेल्या महिन्यात केंद्र सरकारने स्पष्ट केले होते, याची आठवणही त्यांनी करून दिली.
देशात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे ५१ रुग्ण सापडले आहेत. यातले सर्वाधिक २२ रुग्ण महाराष्ट्रात आहेत. तमिळनाडूत ९, मध्य प्रदेशात ७, पंजाबात २, गुजरातेत २, केरळमध्ये ३, तर आंध्र प्रदेश, ओडिशा, राजस्थान, जम्मू-काश्मीर आणि कर्नाटक या राज्यांत डेल्टा प्लसचा प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे. डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे महाराष्ट्रात नवे निर्बंध देखील जारी करण्यात आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App