अजब मिटकरींचे गजब ट्विट : तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये ; हवामान खाते कोमात-नेटकरी हसून हसून लोटपोट

  1. विशेष प्रतिनिधी

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे  कोकण किनारपट्टीसह मुंबई, ठाणे, पालघरला तडाखा दिला. चक्रीवादळामुळे राज्यात नऊ जणांचा मृत्यू झाला असून, सुमारे आठ हजार घरांचे नुकसान झाले.हे भीषण संकट असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी वादळाची गजब सुरेल कहानी केली आहे. ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’, असे अजब विधान करत त्यांनी नेटकर्यांचा संताप ओढावून घेत स्वतःच हसू करून घेतले आहे . यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी देखील त्यांची खिल्ली उडवली आहे.Mitkari’s tweet: trolled on Twitter;Toukte storm is a national storm, it should not make Maharashtra sound

तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा अलर्टवर असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका ट्विटची मात्र चर्चा रंगली आहे. ‘तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे, त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये’, असे अजब ट्विट मिटकरींनी केले.

तौक्ते वादळ राष्ट्रीय वादळ आहे.
त्याने महाराष्ट्राचा नाद करू नये. राष्ट्रीय स्तरावरील वादळ असल्यामुळे याची चिंता दिल्लीश्वरांनी करावी. छ. शिवरायांचे राज्य असे अनेक वादळ परतून लावतो.ती हिम्मत दिल्लीश्वर व इथल्या १०६ शिपायांमध्ये नाही.#सुरीले तौक्ते वादळ.
त्यांचे हे ट्विट व्हायरल होत आहे.

याला काय म्हणणार??? या माणसाचा कचरा करायला शब्दच नाहीत. हवामान खात्यातील कर्मचारी हे वाचून ढसाढसा रडून मरतील. ते म्हणतील उगाच खर्च करून अभ्यास केला, डिग्री मिळवली. आकाशाला खुन्नस देत मिटकरी उभा आहे ना थर्माकोलची तलवार घेऊन, असा जोरदार खोचक टोला निलेश राणेंनी मिटकरींना लगावला आहे.

पब्लिकने देखील केले जोरदार  ट्रोल :

Mitkari’s tweet: trolled on Twitter;Toukte storm is a national storm, it should not make Maharashtra sound