मराठा आरक्षण ही केंद्राची जबाबदारी: बाळासाहेब थोरात ; मराठा आरक्षणाची जबाबदारी टोलवली

विशेष प्रतिनिधी

अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र राज्याला ते अधिकारच नसतील तर आता हा विषय केंद्राच्या हातात आहे. त्यामुळे ही जबाबदारी आता केंद्राचीच असल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. संगमनेर येथे दंडकारण्य अभियान प्रसंगी पत्रकारांशी ते बोलत होते. Maratha reservation is the center Responsibility: Balasaheb Thorat

राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यापेक्षा केंद्र सरकारला पेट्रोल-डिझेलच्या किमती व महागाई कमी करण्याचा सल्ला त्यांनी द्यावा तसेच शेवटी सर्व जण आपापला पक्षवाढीसाठी प्रयत्न करत असतात. प्रत्येकाला तो अधिकार आहे. शिवसेनेने स्वबळाचा नारा दिल्याचे दिसत नाही, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

  •  मराठा आरक्षण ही केंद्राची जबाबदारी: थोरात
  • राज्य सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केल्याचा दावा
  • राज्याला आरक्षण देण्याचा अधिकारच नाही
  •  त्यामुळे आता हा विषय केंद्राच्या हातात आहे
  •  महागाई कमी करा, भाजप नेत्यांना सल्ला
  •  पक्षवाढ करण्याचा प्रत्येक पक्षाला अधिकार
  •  शिवसेनेने स्वबळाचा नारा का नाही दिला ?

Maratha reservation is the center Responsibility: Balasaheb Thorat