लाईफ स्किल्स : स्वतःचे व्यक्तीमत्व आदर्श बनवा

आपण कोणतेही काम करीत असतांना आपणांवर सोपविलेले काम व्यवस्थित केल्यास आपणावर दुसरा व्यक्ती रागावणार नाही. विनाकारण कोणी रागावत असेल तर आपण ती गोष्ट खपून घेता नये अशा व्यक्तीला तेव्हाच ती गोष्ट निदर्शनास आणून देणे आवश्यक असते.Make your own personality ideal

म्हणजे कालांतराने त्या व्यक्तिला स्वतःची चूक कळेल. आपले स्वतःचे चुकले असेल तर आपण आपली चुक कबुल केली पाहिजे व आपल्या हाताने जी चुक झाली अशी चुक आपल्या हातून पुन्हा घडणार नाही याच विचार आपण अगत्याने केला पाहिजे. काही लोकांना स्वतः काम न करता उपदेश देत राहतात अशा व्यक्तीचे कोणी ऐकत नाही म्हणून स्वतः आदर्श काम करून मग दुसऱ्यांना सांगावे. आपण कार्यालयात काम करीत असताना अनेक कर्मचारी पाहत असतो.

मी दहा वर्षापूर्वी एक पंचायत समिती बाबू पाहिले त्यांना माझा मी प्रशिक्षणाचा जिल्हा स्तरावरून आलेला आदेश मागितला असता प्रशिक्षणाचा आदेश प्राप्त होण्यासाठी तुम्हाला शंभर रूपये लागतील. मी म्हटले सरकारी आदेश आहे. तुम्हाला द्यावेच लागेल तर तो म्हणाला मी कोणतेही काम फुकट करीत नाही माझ्यासोबत कोणत्याही शिक्षकाला बोलायचे असेल तर वेळाचे पैसे लागतात. कारण मी एल. एल. बी आहे. तर मी मग म्हटले तुम्ही वकिल का झाले नाही.

मी त्या बाबूला म्हटले की तुम्ही एक दिवस आपल्या अशा वर्तनामुळे तुमची नक्कीच नोकरी जाणार आणि खरेच तोच बाबू एक वर्षाने सस्पेंड झाला. माझी व त्यांची भेट झाली तेव्हा तो व्यक्ती फारच खजील झाला. दुसऱ्यांच्या भावनेचा आदर न करता, कोणताही संयम न बाळगता काम करणारे अनेक कर्मचारी सस्पेंड होत आहे. मग त्याच्या कुटुंबाची काय वाताहात होत असेल तोच व्यक्ती जाणत असतो.

काही कर्मचारी समोरच्या माणसाची योग्य पारख करीत नाही सर्वांना सारख्या मापात तोलत असतो व अशाच वेळी एखादा वरचढ माणूस भेटून त्या व्यक्तिला सस्पेंड करून दाखवितो. म्हणून प्रत्येक कर्मचाऱ्याने इमाने इतबारे काम केल्यास कोणावरही सस्पेंड होण्याची पाळी येणार नाही. कार्यालयात योग्य काम केल्याने आपले सुद्धा एक आदर्श व्यक्तिमत्व तयार होत असते.

Make your own personality ideal

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात