स्त्री-पुरुषातील प्रेमाचे नाते मानवाला मिळालेले एक वरदान आहे. विशाल सागरालाही किनाऱ्यापाशी थांबावे लागते. स्वत्व विसरून, भौतिकात अशक्य अशी एकरूपता एकजीवता काही काळ अनुभविण्याची संधी स्त्री-पुरुष प्रणयात लाभते. संवेदनांची तृप्ती साधता साधता तात्पुरता आत्मविराम व अवर्णनीय आनंद किती प्रेमीजन घेऊ शकतात?Maintain a balance between discipline and behavior in life
बरेच संसार तर आजूबाजूच्या प्रेक्षकांसाठी आपल्या विवाहाचे यशस्वी व्यवहारात रूपांतर करण्याच्या नादात नैसर्गिकता घालवून बसतात, जोडीदारावर वैभवाची उधळण सजावट व प्रदर्शन शिस्त व व्यवहार यांचा तोल सांभाळावा केले जाते, काया-वाचा-मने एकरूपत्व साधायचे राहूनच जाते. नात्याचे तलम वस्त्र विणायचे सोडून, संपत्ती, रूप, कृत्रिम मोहकता, नाटकी विभ्रमांची चमकती ठिगळे जोडलेले महावस्त्र विणायचा उद्योग जागोजाग दिसतो. एखाद्या ताणतणावाने, झटक्याने अशी वस्त्रे उसवताना नजरेस पडतात.
नात्यांची वीण विस्कटायला घराघरांतील सत्तासंबंधही कारणीभूत ठरतात. घरातल्या सत्तेतील बदल अटळ असला तरी तो स्वीकारण्यासाठी वास्तवाची जाणीव, संयम व लवचिकता स्वभावात असावी लागते. पिता-पुत्र, सासू-सून, पती-पत्नी या नात्यांमध्ये समान पातळीवर येणे प्रेमात क्रमप्राप्त आहे. खऱ्या जवळिकीत प्रतिष्ठेची उतरंड शिल्लक राहत नाही; पण नेमके हेच पारंपरिक अधिकाराने सत्ता मिळालेल्या काहींना रुचत नाही. त्यांच्यासाठी कुटुंब हे प्रेमनगर नसते तर सत्तेचे एक रूप असते.
मग माणसे सत्तेच्या गादीसाठी धडपडतात, एकमेकांना बोचकारतात. पुढे कित्येक वर्षे अपमान कुरवाळत राहतात. कुटुंबातील संबंधामध्ये प्रेम, शिस्त व व्यवहार यांचा तोल सांभाळावा लागतो. विशेषत: पालक म्हणून वागताना अतिशिस्त, अतिसवलत, सतत प्रतिकूल टीका, चांगल्या गुणांकडे दुर्लक्ष पण चुकांकडे सतत निर्देश, स्पष्टतेऐवजी संभ्रम निर्माण करणारी वाक्ये, न झेपणारे नियम, अनावश्यक तुलना इ. अनेक संप्रेषणदोष टाळावे लागतात. तसे न केल्यास स्नेह, प्रेम, वात्सल्य, जिव्हाळा पालकांच्या मनात असूनही मुलापर्यंत ते सारे पोहोचत नाही व नात्यामध्ये तिढा निर्माण होतो. मुलांच्या जाणिवा व्यक्तिनिष्ठतेकडून सामाजिक बांधीलकीकडे प्रगल्भतेकडे जाण्यासाठी कुटुंबाशी मुलांचा असलेला नातेसंबंध महत्त्वाचा ठरतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App