देशात ९० च्या दशकातील शेतकरी आंदोलनाचा चेहरा असलेले महेंद्रसिंह टिकैत यांचे स्वप्न नवे कृषि कायदे आणून भारतीय जनता पक्षाने पूर्ण केले. मात्र, आता महेंद्रसिंह यांचा मुलगा राकेश टिकैतच या कायद्यांना विरोध करत आहे. शेतकऱ्यांना आपला माल देशात कोठेही विकता यावा यासाठी महेंद्रसिंह टिकैत यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : देशात ९० च्या दशकातील शेतकरी आंदोलनाचा चेहरा असलेले महेंद्रसिंह टिकैत यांचे स्वप्न नवे कृषि कायदे आणून भारतीय जनता पक्षाने पूर्ण केले. मात्र, आता महेंद्रसिंह यांचा मुलगा राकेश टिकैतच या कायद्यांना विरोध करत आहे. शेतकऱ्यांना आपला माल देशात कोठेही विकता यावा यासाठी महेंद्रसिंह टिकैत यांनी आयुष्यभर संघर्ष केला.
Mahendra Singh Tikait son rakesh Tikait news
उत्तर प्रदेशातील चौधरी महेंद्रसिंह टिकैत यांनी 27 वर्षांपूर्वी मोठे आंदोलन पुकारले होते. तत्कालिन पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासोबत त्यांची बैठकही झाली होती. त्यावेळी टिकैत यांची मुख्य मागणी होती की शेतकऱ्यांना त्यांचा माल देशात कोठेही विकण्यास परवानगी द्यावी. मात्र, नरसिंह राव यांंच्या कॉंग्रेस सरकारने ही मागणी मान्य केली नाही. आता 27 वर्षांनंतर महेंद्रसिंह टिकैत यांची मागणी भाजपाने पूर्ण केली आहे.
मात्र, आता भारतीय किसान संघटनेचे प्रमुख असलेले राकेश टिकैत कायदा रद्द करण्याची मागणी करत आहे. शेतकरी आंदोलनात कोअर ग्रुपमध्ये असलेले ते नेते आहेत. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील टिकैत भारतातील प्रसिध्द शेतकरी नेते होते. भारतीय किसान यूनियनचे ते अध्यक्ष होते. त्यांना शेतकऱ्यांचे मसिहा म्हटले जायचे. 1988 मध्ये दिल्लीमध्ये झालेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केल होते. त्या वेळी राजीव गांधी यांच्या सरकारविरोधात त्यांनी पाच लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढला होता. सात दिवस दिल्लीमध्ये शेतकरी होते. त्या वेळी कॉंग्रेसने शेतकरी आंदोलनावर गोळीबारही केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App