महावीर जयंती, हनुमान जयंतीच्या मिरवणुका, प्रभात फेऱ्यांना बंदी ; पुणे आयुक्‍तांच्या सूचना

वृत्तसंस्था

पुणे : रामनवमीसह महावीर जयंती तसेच हनुमान जयंतीला शहरात मिरवणूक काढण्यास तसेच सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यास महापालिकेने बंदी घातली आहे. आयुक्‍त विक्रम कुमार यांनी मंगळवारी याबाबतचे आदेश काढले आहेत. Mahavir Jayanti, Hanuman Jayanti processions,
Morning rounds banned

बुधवारी (ता.20 ) रामनवमी असून, महावीर जयंती (ता.25 ) तर हनुमान जयंती (ता.27 ) आहे. पण, शहरातील कोरोनाची गंभीर स्थिती पाहता या तीनही उत्सवांसाठी महापालिकेने नियमावली जाहीर केली असून, ती पुढीलप्रमाणे.



अशा आहेत सूचना

* सण, उत्सव घरी साधेपणाने साजरे करा
* मंदिरांत भजन, कीर्तन, पठण असे सार्वजनिक कार्यक्रम आयोजित करू नये.
* मंदिराचे विश्‍वस्त, व्यवस्थापन यांनी भाविकांसाठी ऑनलाइन दर्शनाची सोय करावी.
* देव-देवतांच्या उत्सव, जयंतीनिमित्त मिरवणूक, प्रभात फेरी काढू नये.
* सर्व मंदिराच्या ठिकाणी शासकीय नियमांचे पालन करणे बंधनकारक.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात