नाशिक : पुरोगामी महाराष्ट्राच्या नुसत्याच तोंडी वाफा, दुसऱ्या टप्प्यात मतदारांनी घरात काढल्या झोपा!!, अशीच आज महाराष्ट्रातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानाची अवस्था होती. देशातल्या इतर 12 राज्यांमध्ये प्रचंड ऊन असताना देखील मतदारांनी बाहेर पडून मतदानाला उत्तम प्रतिसाद दिला, त्या उलट संपूर्ण देशाला पुरोगामीत्वाचे लेक्चर देणाऱ्या महाराष्ट्रातल्या मतदारांनी मात्र मतदानाकडे पाठ फिरवून घरी झोपा काढल्या. मतदानाच्या घसरलेल्या टक्केवारीची आकडेवारीने याचाच आरसा दाखविला.Maharashtra went fast a sleep on 2nd phase polling day 26 April 2024
सत्ताधारी शिवसेना – भाजप आणि राष्ट्रवादी महायुती तसेच विरोधी शिवसेना – काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही गोट आपापल्या मतदारांना बाहेर काढून मतदान केंद्रावर रांगा लावण्यात अपयशी ठरले. महाविकास आघाडीने महायुती विरुद्ध मोठे रणशिंग फुंकले. अगदी तुतारीवाला माणूस महाराष्ट्रभर फिरवला. त्याचा मतदानाच्या टक्केवारीवर काहीही सकारात्मक परिणाम झाला नाही. महाराष्ट्राच्या जनतेने तुतारीच्या आवाजाकडे पाठच फिरवल्याचे दिसले.
त्या उलट महायुतीच्या विशेषत: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मोठमोठ्या सभा पूर्व आणि पश्चिम विदर्भात झाल्या. त्याला नागरिकांनी प्रतिसादही जोरदार दिला, पण प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसले. त्या उलट उत्तर प्रदेश, बिहार, केरळ, राजस्थान, कर्नाटक छत्तीसगड, त्रिपुरा या सगळ्या राज्यांमध्ये मतदारांनी पहिल्या टप्प्याच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर मतदानाला प्रतिसाद दिला. मतदान केंद्रांवर या सर्व राज्यांमध्ये मोठ्या रांगा दिसल्या.
महाराष्ट्र उदासीन
महाराष्ट्राची पुरोगामी अशी ख्याती आहे. पण या पुरोगामी महाराष्ट्रात यंदा सर्वांत कमी मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रतील एकूण 8 मतदारसंघांमध्ये आज पार पडलेल्या मतदानाची आकडेवारी धक्कादायक होती. कारण संपूर्ण देशात इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दुपारी 3.00 वाजेपर्यंत सर्वांत कमी टक्के मतदान झाले.
किती टक्के मतदान?
महाराष्ट्रात दुपारी 3.00 वाजेपर्यंत फक्त 43.01 % मतदान झाले. परभणी लोकसभा मतदारसंघात सर्वाधिक 44.49 % मतदान झाले. अकोल्यात 42.69 %, तर वर्धा मतदारसंघात 45.95 % मतदान झाले. अमरावती लोकसभा मतदारसंघात 43.76 % मतदान झाले, तर बुलढाण्यात 41.66 % मतदान होऊ शकले. हिंगोलीत 40.50 %, नांदेडमध्ये 42.42 % मतदान झाले. यवतमाळ-वाशिममध्ये 42.55 % मतदान झाले.
Voter turnout till 5 pm for phase 2 of #LokasabhaElection2024 Assam 70.66%Bihar 53.03% Chhattisgarh 72.13% Jammu And Kashmir 67.22% Karnataka 63.90% Kerala 63.97%Madhya Pradesh 54.83% Maharashtra 53.51%Manipur 76.06% Rajasthan 59.19% Tripura 77.53%… pic.twitter.com/XUBiu9MJ6N — ANI (@ANI) April 26, 2024
Voter turnout till 5 pm for phase 2 of #LokasabhaElection2024
Assam 70.66%Bihar 53.03% Chhattisgarh 72.13% Jammu And Kashmir 67.22% Karnataka 63.90% Kerala 63.97%Madhya Pradesh 54.83% Maharashtra 53.51%Manipur 76.06% Rajasthan 59.19% Tripura 77.53%… pic.twitter.com/XUBiu9MJ6N
— ANI (@ANI) April 26, 2024
त्या उलट देशातले सगळ्यात छोटे राज्य त्रिपुरामध्ये जनतेने मतदानाला भरघोस प्रतिसाद दिला. त्रिपुरा राज्यात 68.92 % मतदान झाले.
इतर राज्यांमध्ये किती टक्के मतदान?
देशात 13 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये एकूण 88 लोकसभा मतदारसंघांमध्ये आज मतदान पार पडत आहे. केरळमध्ये 20, कर्नाटकमध्ये 14, राजस्थानमध्ये 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात प्रत्येकी 8 जागा, मध्य प्रदेशात 6, आसाम आणि बिहारमध्ये प्रत्येकी 5, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 3, त्रिपुरामध्ये 1 आणि जम्मू-काश्मीरमध्ये 2 जागांवर मतदान झाले.
दुपारी 3.00 वाजेपर्यंतची आकडेवारी
त्रिपुरा 68.92 % , आसाम 60.32 %, बिहार 44.24 %, छत्तीसगड 63.92 % , जम्मू-काश्मीर 57.76 %, कर्नाटक 50.93 %, केरळ 51.64 %, मध्य प्रदेशात 46.50 %, राजस्थानात 50.27 %, पश्चिम बंगाल 60.60 % आणि महाराष्ट्र 43.01 % एवढे मतदान झाले.
मराठी माध्यमांची मखलाशी
महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली, ही बाब महाराष्ट्रातल्या जनतेला आवडली नसल्याची मखलाशी मराठी माध्यमांनी केली, पण त्याचे प्रतिबिंब मात्र बिलकुलच मतदानाच्या टक्केवारीत उमटलेले दिसले नाही. पक्षात फूटपाड्या राजकारणाविरुद्ध मतदारांचा संताप उसळून मतदार घराबाहेर पडून मतदान करताना दिसला नाही. महाराष्ट्राने कायमच देशाला पुरोमीत्वाचे मार्गदर्शन केले. देशात विविध चळवळीची सुरुवात महाराष्ट्राने करून दिली, अशा बाता महाराष्ट्रातले ब्रॅण्डेड विचारवंत नेहमी मारतात.
2024 लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातल्या बहुतेक ब्रँडेड विचारवंतांनी लोकशाही धोक्यात आल्याची थाप ठोकली होती. परंतु, त्याविरुद्ध मतदाराचा कुठलाही संताप उसळून बाहेर आला नाही आणि मतदार मतदान करायला बाहेर पडलेला दिसला नाही. प्रत्यक्षात महाराष्ट्रातल्या जनतेने मतदानाकडे पाठ फिरवत विचारवंतांनी प्रस्थापित केलेल्या पुरोगामीत्वाला हरताळ फासला आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App