M. J. Akbar : बर्‍याच दिवसांनी एम. जे. अकबर दिसले, तेही पंतप्रधानांबरोबर… प्रधानमंत्री संग्रहालयात… का…??


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कॅबिनेट मधले एक माजी सेलिब्रिटी मंत्री एम. जे. अकबर बऱ्याच दिवसांनी एका सार्वजनिक कार्यक्रमात दिसले. तेही पंतप्रधानांबरोबर…!!M. J. Akbar: Many days later M. J. Akbar appeared, also with the Prime Minister … in the Prime Minister’s Museum … why

 प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन

प्रधानमंत्री संग्रहालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात जेव्हा नरेंद्र मोदी आले, तेव्हा त्यांच्या पाठोपाठ एम. जे. अकबर दिसले. अर्थात पंतप्रधानांचे तीन मूर्ती भवन परिसरात केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी यांनी स्वागत केले होते. पण एम. जे. अकबर त्यांच्यानंतर पंतप्रधानांसमवेत दिसले. हेच ते एम. जे. अकबर आहेत, की ज्यांच्यावर 2018 मध्ये लैंगिक अत्याचाराचा आरोप लागल्यानंतर त्यांना राजीनामा द्यायला भाग पाडले होते. त्यानंतर बरेच दिवस एम. जे. अकबर राजकीय अज्ञातवासात गेल्यासारखे झाले होते. ते राज्यसभेचे सदस्य आहेत. पण ते फारसे कुठे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात नंतर दिसले नव्हते. याचा अर्थ “ऍक्टिव्ह” नव्हते, असा नाही.नेहरू दालनासाठी काम

मधल्या काळात “इकनॉमिक टाईम्स” सारख्या इंग्रजी माध्यमांमधून अकबर यांच्या विषयी काही बातम्या आल्या होत्या. पण त्या नेहरू मेमोरियल म्युझियम आणि लायब्ररी संदर्भात. ते संस्थेचे उपाध्यक्ष आहेत आणि सध्या जे प्रधानमंत्री संग्रहालय सुरू झाले आहे, त्यामध्ये जी दोन नेहरू दालने आहेत त्या मधल्या बऱ्याच गोष्टी अकबर यांच्या मार्गदर्शनाखाली लिहिण्यात आणि ठेवण्यात आल्या आहेत.

नेहरूंचे चरित्रकार

एम. जे. अकबर हे पंडित जवाहरलाल नेहरूंचे चरित्रकार आहेत. पंडित नेहरू यांचे निवासस्थान आणि नंतर बनलेले स्मारक म्हणजे तीन मूर्ती भवन. याच परिसरात प्रधानमंत्री संग्रहालय आहे. प्रधानमंत्री संग्रहालयातील दोन दालने पंडित जवाहरलाल नेहरू यांना समर्पित आहेत. या दोन दालनात मधल्या वस्तूंची निवड, पंडित नेहरू यांच्या संदर्भातली साहित्याची निवड ही अकबर यांनी केली आहे. हे काम मधल्या दोन वर्षांच्या काळात शांततेत सुरू होते. त्याचा फारसा कुठे गाजावाजा करण्यात आला नव्हता.

काल जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री संग्रहालयाचे उद्घाटन झाले, तेव्हा जी. किशन रेड्डी, पंतप्रधानांचे माजी सचिव नृपेंद्रा मिश्रा, विनय सहस्रबुद्धे, स्वपन दासगुप्ता यांच्याबरोबर एम. जे. अकबरही दिसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

शंका डोकावली पण…

सहसा एखाद्या वादग्रस्त प्रकरणात एखाद्या मंत्र्याला राजीनामा द्यायला लागल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्या मंत्र्याला अथवा त्या नेत्याला फारसे जवळ करताना दिसत नाहीत. निदान सार्वजनिक कार्यक्रमात तरी ते फारसे जवळ करत नाहीत…!! पण एम. जे. अकबर प्रधानमंत्री संग्रहालयाच्या उद्घाटन समारंभात काही वेळ तरी पंतप्रधान मोदी यांच्या बरोबर दिसले.

त्यामुळे अनेकांच्या मनात शंका डोकावली, अकबर यांचे राजकीय पुनर्वसन होते आहे का…?? त्यांचा पुन्हा एकदा परराष्ट्र राज्यमंत्री म्हणून वापर करून घेऊन आखाती देशांची विशिष्ट संबंध वाढवण्यात येणार आहेत का…??, असे हे सवाल होते. परंतु, यातली वस्तुस्थिती अशी होती, की अकबर हे नेहरू मेमोरियल म्युझियम लायब्ररीचे सदस्य आहेत. त्यामुळे ते पंतप्रधानांच्या बरोबरच्या कार्यक्रमात काही वेळ दिसले एवढेच…!!

M. J. Akbar: Many days later M. J. Akbar appeared, also with the Prime Minister … in the Prime Minister’s Museum … why

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय