वृत्तसंस्था
लखनौ : लव्ह जिहाद विरोधात उत्तर प्रदेशात नवीन कायदा लागू करण्यात आला आहे. तीन दिवसांपूर्वी बरेलीमध्ये या अध्यादेशातंर्गत पहिला एफआयआर नोंदवण्यात आला. या प्रकरणातील आरोपी ओवैस अहमदला अटक करण्यात आली आहे. हिंदू मुलीला इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी जबरदस्ती केल्याचा तसेच मुलीच्या पालकांनी धर्मांतरावर आक्षेप घेतल्यानंतर त्यांना धमकावल्याचा ओवैस अहमदवर आरोप आहे. love jihad news
आरोपी ओवैस अहमद मागच्या काही दिवसांपासून फरार होता. त्याच्या विरोधात एफआयआर दाखल झाल्यानंतर २८ नोव्हेंबरपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आयपीसीच्या कलम ५०४, ५०६ आणि ‘विधि विरुद्ध धर्म संपरिवर्तन प्रतिषेध अध्यादेश 2020’ अंतर्गत त्याच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे. love jihad news
ओवैसचे एका हिंदू मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. मागच्या वर्षी ते पळून गेले होते. ओवैसला त्यावेळी अटक झाली होती. मुलीच्या वडिलांनी त्याच्यावर अपहरणाचा आरोप केला होता. पण मुलीने तो आरोप फेटाळून लावला. एप्रिल महिन्यात मुलीच्या कुटुंबीयांनी तिचे दुसरीकडे लग्न लावून दिले. love jihad news
या प्रकरणात मुलीच्या वडिलांनी रविवारी एफआयआर नोंदवला. ओवैस दबाव आणून आपल्या मुलीचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करत होता. तो आमच्या कुटुंबाला सुद्धा धमकावत होता, असा आरोप मुलीच्या वडिलांनी केली आहे.
“मुलीचे लग्न झाल्याचे समजल्यापासून ओवैस मुलीच्या कुटुंबीयांना त्रास देत आहे. मुलीला परत पाठवा. मुलीने धर्मांतर केल्यानंतर दोघांचे लग्न लावून देण्यासाठी कुटुंबीयांवर दबाव टाकत आहे” असे या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. शनिवारी तो मुलीच्या घरी गेला होता. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार नोंदवली असे एसएचओ दया शंकर यांनी सांगितले. लव्ह जिहाद विरोधी बनवलेल्या नव्या कायद्यातंर्गत १० वर्ष तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App