Virat Kohli : Virat Kohli :टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठी घोषणा केली आहे. विराट कोहलीने एका निवेदनात म्हटले आहे की, टी -20 विश्वचषकानंतर मी टी -20 प्रकारातील कर्णधारपद सोडणार आहे. कोहली म्हणाला, “मी माझ्या जवळच्या लोकांशी, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. Know Who Will Be Next T-20 Captain of Indian Team after Virat Kohli
विशेष प्रतिनिधी
मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने एक मोठी घोषणा केली आहे. विराट कोहलीने एका निवेदनात म्हटले आहे की, टी -20 विश्वचषकानंतर मी टी -20 प्रकारातील कर्णधारपद सोडणार आहे. कोहली म्हणाला, “मी माझ्या जवळच्या लोकांशी, मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि रोहित शर्मा यांच्याशी सल्लामसलत केल्यानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मी माझ्या कर्णधारपदादरम्यान संघाला खूप काही दिले आहे. कामाचा ताण लक्षात घेऊन 2021 टी-20 विश्वचषकानंतर टी-20 फॉरमॅटमध्ये भारताच्या कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा मी निर्णय घेतला आहे. पण मी एक फलंदाज म्हणून संघाचे समर्थन करत राहीन.”
आता कोहलीच्या या घोषणेनंतर टी -20 मध्ये टीम इंडियाचे कर्णधारपद कोण सांभाळणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याबद्दल आधीच अनेक नावांची चर्चा झाली आहे. आज आम्ही तुम्हाला त्या दोन नावांविषयी सांगणार आहोत जे आता कोहलीऐवजी टी -20 सामन्यात टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळू शकतात.
टीम इंडियाचा सलामीवीर रोहित शर्माला टी -20 चे कर्णधारपद मिळण्याची शक्यता आहे. अनेक वेळा क्रिकेट कॉरिडॉरमध्ये अशी चर्चा झाली की, कोहलीनंतर रोहित शर्माला टीम इंडियाची कमान मिळेल. कोहली आणि रोहित यांच्यात कर्णधारपदाबाबत मतभेद झाल्याचेही वृत्त होते, परंतु दोन्ही खेळाडूंनी ते फेटाळले. आता रोहित शर्माला टी -20 च्या कर्णधारपदाची जबाबदारी मिळेल की नाही, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 19 पैकी 14 सामने जिंकले आहेत, तर चार गमावले आहेत.
दुसरा खेळाडू जो टी -20 संघाचा कर्णधार बनवण्याची शक्यता आहे तो ऋषभ पंत आहे. रोहित शर्मा कर्णधारपदाच्या शर्यतीत पुढे दिसत असेल, पण या युवा खेळाडूला शर्यतीतून बाहेर मानता येणार नाही. ऋषभ पंत सध्या आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे.
टीम इंडियाने टी -20 इंटरनॅशनलमध्ये विराटच्या नेतृत्वाखाली 45 सामने खेळले आहेत, त्यापैकी भारताने 29 जिंकले आहेत, तर 14 हरले आहेत. दोन सामन्यांचा निकाल आलेला नाही.
Know Who Will Be Next T-20 Captain of Indian Team after Virat Kohli
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App