वृत्तसंस्था
सांगली : दिवाळीपर्यंत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची इलेव्हन सेना तुरुंगात जाईल, तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड तुम्ही आता बॅग भरा…असा थेट इशारा भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला आहे. ठाकरेंच्या इलेव्हन सेनेच्या भ्रष्टाचाराचे घोटाळे पुराव्यासह उघडकीस आणणार, असल्याचे सोमय्या यांनी म्हटले आहे. Kirit Somaiya criticizes Uddhav Thackeray Goverment
किरीट सोमय्या सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ते म्हणाले, परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांना ईडीकडून नोटीस बजावली आहे. या पार्श्वभूमीवर सोमय्या यांनी सोमवारी बजरंग खरमाटे यांच्या सांगली जिल्ह्यातल्या तासगाव येथील वंजारवाडी गावासह खरमाटे यांच्या मालमत्ताच्या ठिकाणांना भेट दिली आहे. त्यानंतर त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली आहे.
बजरंग खरमाटे हे परिवहन मंत्री अनिल परब यांचे विशेष सचिव होते. त्यामुळे ४० प्रॉपर्टीची बेहिशोबी साडेसातशे कोटींची मालमत्ता आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला. ती कुठून आली? याची मागण केली आहे. तर खरमाटे यांची ही संपत्ती आहे की, अनिल परब यांचा बेनामी पैसा आहे. लवकरच समोर येईस, असेही सोमय्या यांनी म्हटले आहे. पण ठाकरे सरकारांचा एक अनिल तुरुंगाचा दरवाजावर आहे. तर दुसरा अनिल म्हणजे अनिल परब मुहूर्त काढत आहेत, असेही सोमय्या म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी ९०० कोटी रुपयांचा घोटाळा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दुसऱ्या दिवशीच केला आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला. आता अनिल परब यांच्यावर कारवाई झालेली आहे. पुढच्या आठवड्यात भावना गवळीच्यावर होणार आणि त्याचबरोबर जितेंद्र आव्हाड यांचाही नंबर असून आव्हाड यांना आपली जाहीर नोटीस असणार आहे. त्यामुळे आव्हाड तुम्ही देखील आता बॅग भरायला लागा, असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App