वॉशिंग्टनमध्ये कृषि कायद्यांना विरोध करणाऱ्यांकडून महात्मा गांधींच्या पुतळ्यांची तोडफोड; खलिस्थानचे झेंडेही फडकावले!

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेत आंदोलनाचे आयोजन केले होते. या वेळी आंदोलकांनी भारतीय दुतावासातीच्या जवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली.


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिेकेतील वॉशिंग्टन येथे झालेल्या आंदोलनात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. या वेळी खलिस्थानचे झेंडेही फडकाविण्यात आले.

Khalistanis target Mahatma Gandhi statue in Washington

दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अमेरिकेत आंदोलनाचे आयोजन केले होते. या वेळी आंदोलकांनी भारतीय दुतावासातीच्या जवळ असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड करण्यात आली. आंदोलकांनी खलिस्थानच्या घोषणाही दिल्या.

शेतकरी आंदोलनातील हेट स्पिचनंतर योगराज सिंग यांची काश्मीर फाईल्स सिनेमातून हकालपट्टी

अमेरिकेचे भारतातील राजदूत केन जस्टर यांनी याबाबत भारताकडे दिलगिरी व्यक्त केली आहे. ते म्हणाले, महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड होणे ही अत्यंत दु:खदायक घटना आहे. आम्ही याबाबत दिलगिरी व्यक्त करतो.

कृषि कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकºयांनी आंदोलन सुरू केले आहे. पंजाबमधील शेतकरी त्यासाठी दिल्ली येथे जमले आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी परदेशातही अनेक ठिकाणी आंदोलन होत आहे. प्रामुख्याने अमेरिका आणि कॅनडातील शिख समाजाने त्याला पाठिंबा दिला आहे.

Khalistanis target Mahatma Gandhi statue in Washington

महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची तोडफोड होणे ही अत्यंत दु:खदायक घटना आहे. आम्ही याबाबत दिलगिरी व्यक्त करतो. : केन जस्टर, अमेरिकेचे भारतातील राजदूत

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*