विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या राजकीय सल्लागाराची जागा पक्षाबाहेर गेलेल्या ज्येष्ठ नेत्याकडून स्वतःच भरण्याची “वेगळी तयारी” सुरू असताना अहमद पटेल यांच्या जागी कमलनाथ किंवा अशोक गेहलोत या काँग्रेसच्याच नेत्यांच्या नावाची पक्षात चर्चा सुरू झाली आहे. kamal nath or ashok gehlot
काँग्रेसला पूर्णवेळ अध्यक्ष असावा असे पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांना सोनिया गांधी उद्या सकाळी १०.०० वाजता भेटणार आहेत तर दुसरीकडे अहमद पटेल यांची जागा कोण घेणार याच शोध सुरु झाला आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. kamal nath or ashok gehlot
यासाठी काँग्रेसमधून बाहेर पडावे लागलेले ज्येष्ठ नेते “वेगळ्या” मार्गाने प्रयत्न करत असल्याची प्रसार माध्यमांमधून चर्चा घडविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर कमलनाथ आणि अशोक गेहलोत यांच्या नावाची चर्चा सुरू होणे याचा अर्थ बाहेर पडलेल्यांना आणि “वेगळ्या” मार्गाने येण्याचा प्रयत्न करणाऱ्या ज्येष्ठ नेत्याला काँग्रेस नेतृत्व संधी देणार नसल्याचेच स्पष्ट होते आहे.
________________________
काँग्रेसमध्ये अहमद पटेल यांची जागा घेणे अवघड असले तरी अशक्य नाही, असाच सिग्नल काँग्रेसचे नेतृत्व देत असल्याचे दिसते. अहमद पटेलांची जागा घेणारे नेते पक्ष आणि तिजोरी सांभाळणे, हायकमांड आणि पक्षातला दुवा बनतील.
कमलनाथ हे संजय गांधी यांचे सहकारी, तेव्हापासून ते गांधी घराण्याच्या विश्वासू वर्तुळातले राहिले आहेत. शिवाय उद्योगाची पार्श्वभूमी असल्याने पक्षाला आवश्यक असलेला फंड ते आणू शकतील असा कयास बांधण्यात येतो आहे. गहलोत यांच्याही नावाची यासाठी चर्चा सुरू आहे. राजस्थानचे पूर्णवेळ दोनदा मुख्यमंत्रीपद आणि पक्षाचे केंद्रीय सरचिटणीसपद यशस्वीरित्या संभाळणे ही कामगिरी त्यांच्या नावावर जमा आहे.
अहमद पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसमध्ये एक पोकळी निर्माण झाली आहे. कारण काँग्रेसमध्ये नव्या आणि जुन्या पिढीतला समतोल साधण्याचे काम ते करत होते. हायकमांडला संघटनेच्या अंतर्गत बित्तंबातमी तेच देत होते. आता कमलनाथ यांच्या नावाची चर्चा होत आहे, तेव्हाच कमलनाथ यांनी मात्र निवृत्तीबद्दलचे विधान केले आहे. तर गहलोत यांच्या दिल्लीवारीने पटेलांची जागा गेहलोत घेणार याबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
काँग्रेसमध्ये पत्र लिहिणारे 23 नेते शनिवारी सोनिया गांधींना भेटणार आहेत. ऑगस्ट महिन्यात या नेत्यांनी पत्र लिहून पक्षाच्या अवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली होती. या बैठकीचे वैशिष्टय म्हणजे पहिल्यांदाच या नेत्यांना अधिकृतपणे आपले म्हणणे थेट सोनिया गांधी यांच्यासमोर मांडण्याची संधी मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App