प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिकच्या स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्टेशन परिसराचा विकास केला जाणार आहे. त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पात स्टेशन शेजारी असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान बाधित होत आहे.Kalyan- Dombivali The corporation finally bowed
ते वाचविण्यासाठी लक्ष्मीबाई ससाणे ( वय ८५) यांनी उद्यानातच बेमुदत उपोषणास दोन दिवसांपासून सुरुवात केली होती. दरम्यान, शनिवारी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार यांनी त्यांची भेट घेतली. या उद्यानाला मागच्या बाजूस देण्यात येईल, असे लेखी आश्वासन सुनिल पवार यांनी ससाणे यांना दिले. त्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आल्याचे जाहीर केले.
स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या स्टेशन परिसर विकासांतर्गत महात्मा फुले चौक ते सुभाष चौक २४ ते ३० मीटर रस्ता रुंदीकरण करण्याचे नियोजित आहे. यापूर्वी रस्ता रुंदीकरणात हे उद्यान दोन वेळा बाधीत होणार होते. पुन्हा ते स्टेशन परिसर विकास प्रकल्पात बाधीत होत आहे. या प्रकरणी शेकडो नागरिकांनी हरकती घेतल्या आहेत. महापालिका उद्यानाची जागा घेणार असल्याने आंबेडकरी अनुयायी संतप्त झाले आहेत. मोक्याच्या ठिकाणी आंबेडकर उद्यान आहे. उद्यान बाधीत होण्यापूर्वीच आंबेडकरी अनुयायी महापालिकेच्या विरोधात एकवटले आहे.
– कल्याण- डोंबिवलीची पालिका अखेर झुकली
– आजीबाईंमुळे उद्यानाला पर्यायी जागा देणार
– स्मार्ट सिटीत उद्यान जाण्याची होती भीती
– रस्ता रुंदीकरणात उद्यान जाण्याची होती धास्ती
– तीन वेळा उद्यानावर आली होती संक्रात
– उद्यानाला पर्यायी जागा देण्याचे आश्वासन
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App