“पोरासोरांचा कारभार नकोय” म्हणणे ठीक आहे, पण काँग्रेसची नौका निवडणूकीच्या पार नेणार कोण?, जुने जाणते नेते आणायचे कुठून?

गुजरात प्रदेश काँग्रेसच्या नेतृत्व पदावरून काँग्रेसमध्ये मोठा खल चाललेला असताना हार्दिक पटेल यांच्यासारख्या नवोदित नेत्याकडे प्रदेशाध्यक्षपद सोपवू नये, असा “पोक्त” विचार काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्या पुढे मांडला, हे खरे आहे. पण खरा प्रश्न तर त्यापुढचा आहे. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना पोरारांचा पक्षात कारभार नको आहे, पण मग काँग्रेसमध्ये जुने जाणते आणि ज्येष्ठ नेते आणायचे कुठून आणि ते निवडणूकीच्या राजकारणात परिणामकारक तरी ठरतील का?, हा खरा प्रश्न आहे.It is right to say “I don’t want to take care of Porasora”, but who will take the boat of Congress beyond the elections? Where to bring old wise leaders?

एकीकडे सोनिया गांधी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी खरोखरच गांभीर्याने पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करत आहेत. यासाठीच त्यांनी त्यांच्या समजुतीनुसार हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि कन्हैयाकुमार यांच्यासारखे नेते तरुण तडफदार पक्षात आणले आहेत. या नेत्यांच्या एकूण राजकीय कर्तृत्वाविषयी कितीही शंका असली तरी त्यांचे वय तरुण असणे ही काँग्रेससाठी सर्वात लाभदायक ठरणारी गोष्ट आहे हे विसरून चालणार नाही. अशा स्थितीत त्यांना पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांचा त्यांना होणारा विरोध एक प्रकारे अनाकलनीय आहे.राजकीय परिपक्वता या तरूण नेत्यांकडे नाही ही वस्तुस्थिती आहे. पण जे पक्षाचे वरिष्ठ नेते या तरुण नेत्यांविषयी तक्रारी करत आहेत, त्यांची तरी राजकीय कार्यक्षमता पक्षाची नौका निवडणुकीच्या पार घेऊन जाण्याची आहे का?, याचे उत्तर कोण देणार?

एकीकडे ममता बॅनर्जी यांच्यासारखे कडक नेतृत्व भाजपवर तोफा डागत असताना प्रत्यक्षात काँग्रेस फोडत आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गळाला लावत आहे. सुष्मिता देव, लुईजिनो फालेरो ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. ममता बॅनर्जी येत्या 28 तारखेपासून गोव्यात आहेत. त्या आणखी किती काँग्रेस नेते फोडतील, याची कोण शाश्वती देणार? महिला काँग्रेसचे अखिल भारतीय अध्यक्षपद भूषविणारे नेते किंवा पक्षाने मुख्यमंत्रीपद दिलेले नेते पक्ष सोडून जात असतील तर राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्यापुढे दुसरा पर्याय काय उरतो? आपण काँग्रेसमध्ये समाविष्ट करून घेतलेल्या नेत्यांना निर्णायक महत्त्वाच्या पदांवर नेमण्याखेरीज त्यांच्यापुढे पर्याय आहे का? याचाही विचार करण्याची गरज आहे.

ममता बॅनर्जी या बंगाल, आसाम आणि गोव्यात काँग्रेस फोडत असताना उडिशातही पक्षाचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष प्रदीप मांझी या आदिवासी नेत्याने काँगेस सोडली आहे. याचा अर्थ पक्षातली गळती थांबायला तयार नाही. ममतांची महत्त्वाकांक्षा राष्ट्रीय पातळीवर पोहोचलेली असताना काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षातून जर गळती होत असेल तर ती रोखण्याला राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी प्राधान्य देऊन त्यांच्या समजुतीनुसार करून नेत्यांची पक्षात भरती केली असेल तर त्यात त्यांचे काय चुकले?

शेवटी काँग्रेस पक्ष गांधी कुटुंबीयांनाच चालवायचा आहे. संपूर्ण काँग्रेस कार्यकारिणीने त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. पक्षातले जी 23 या गटाचे नेते कितीही गांधी परिवारा विरोधात पत्रकार परिषदा घेत राहिले तरी देखील त्या 23 नेत्यांची राजकीय क्षमता देखील किती मर्यादित आहे, हे काळाच्या कसोटीवर सिद्ध झाले आहे. यातला एकही नेता स्वतःच्या बळावर छोट्या प्रदेशातली देखील निवडणूक जिंकू शकत नाही ही कटू असली तरी राजकीय वस्तुस्थिती आहे.

त्यामुळे हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी किंवा कन्हैया कुमार यांच्यासारख्या तरुण नेत्यांना “पोरेसोरे” म्हणून हिणवणे सोपे आहे. पण त्यांनी आपली राजकीय कारकीर्द पुढेच न्यायची नाही किंवा कधी नेतृत्वच करायचे नाही असे मानणे देखील चूक आहे. हार्दिक पटेलला गुजरातमध्ये मिळणारा प्रतिसाद हा अन्य कोणत्याही विद्यमान गुजराती काँग्रेसच्या नेत्यापेक्षा कितीतरी जास्त आहे. जिग्नेश मेवाणी किंवा कन्हैया कुमार यांच्याबद्दल कितीही मतभेद, तक्रारी असल्या तरी मोठ्यातले मोठे निवडणूक सभांचे फड गाजवणारे वक्तृत्व त्यांच्याकडे आहे, ही वस्तुस्थिती दुर्लक्ष करून चालणार नाही.

त्यामुळेच एकीकडे काँग्रेसला गळती लागत असताना आणि भविष्यातही ही गळती थांबण्याची शक्यता नसताना जर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी आपल्या चॉईसनुसार तरुण नेते पक्षात घेत असतील आणि त्यांना ते मोठी पदे देणार असतील, तर ते राजकीयदृष्टीने गैर मानण्यात मतलब नाही.

It is right to say “I don’t want to take care of Porasora”, but who will take the boat of Congress beyond the elections? Where to bring old wise leaders?

महत्त्वाच्या बातम्या