वृत्तसंस्था
नवी दिल्ली : अयोध्येत राम मंदिर निर्मितीसाठी जलाभिषेक करण्यासाठी जगातील ११५ देशातून पाणी आणले आहे. ही बाब भारतासाठी गौरवास्पद आहे, अशी माहिती खुद्द संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली. It is glorious to bring water from 115 countries for construction of Ram temple: Rajnath Singh ; Message of Vasudhaiva Kutumbakam
नुकत्याच एका गैर सरकारी संस्थेने राम मंदिर निर्माण करण्यासाठी ११५ देशातून पाणी जलाभिषेक करण्यासाठी आणल्याचा दावा केला होता. त्यावर सिंह यांनी शनिवरी याबाबतची माहिती दिली. तसेच राम ललाच्या जलाभिषेकासाठी सर्व देशातून पाणी आणलेच पाहिजे. भारतीय ऋषिनी विश्वालाच कुटुंब मानले आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ चा संदेश त्यांनी जगाला दिला आहे. त्यामुळेच राम मंदिर निर्माण व जलाभिषेक करण्यासाठी सर्व देशांतून पाणी आणले पाहिजे. हे पाणी स्वीकारल्यानंतर त्यांनी ही माहिती स्वतःच उघड केली आहे.
या पूर्वी अन्य देशातून पाणी आणल्याचे वृत्त माध्यमात प्रसारित झाले होते. त्यामध्ये ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, अफगाणिस्तान, कॅनडा, कंबोडिया, जर्मनी, इटलीसह अन्य देशांचा समावेश होता. हा भारताचा गौरव असल्याचे ते म्हणाले.
भारताला जाती-धर्मावर तोडता येणार नाही, असे सांगताना ते म्हणाले, हिंसेचे समर्थन भारताने केले नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राम मंदिराचे काम सुरु झाले. ही सकारात्मक सुरुवात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App