Irans Surgical Strike on Pakistan

पाकिस्तानवर इराणचा सर्जिकल स्ट्राइक, पाकच्या नाकावर टिचून आपल्या जवानांची केली सुटका

शेजारी देश पाकिस्तानला आणखी एका सर्जिकल स्ट्राइकला सामोरे जावे लागले आहे. परंतु यावेळी ही सर्जिकल स्ट्राइक इराणने केली आहे. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने (आयआरजीसी) पाकिस्तानमध्ये प्रवेश करून आपल्या जवानांना सोडवून नेल्याचे सांगितले जात आहे. इराणने असा दावा केलाय की, त्यांच्या दोन जवानांना पाकमध्ये करण्यात आलेल्या सीक्रेट मोहिमेत वाचवण्यात आले. Irans Surgical Strike on Pakistan


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : शेजारी देश पाकिस्तानला आणखी एका सर्जिकल स्ट्राइकला सामोरे जावे लागले आहे. परंतु यावेळी ही सर्जिकल स्ट्राइक इराणने केली आहे. इराणच्या रेव्होल्यूशनरी गार्डने (आयआरजीसी) पाकिस्तानमध्ये प्रवेश करून आपल्या जवानांना सोडवून नेल्याचे सांगितले जात आहे. इराणने असा दावा केलाय की, त्यांच्या दोन जवानांना पाकमध्ये करण्यात आलेल्या सीक्रेट मोहिमेत वाचवण्यात आले.

दक्षिणपूर्व इराणमधील आयआरजीसी ग्राऊंड फोर्सच्या क्यूजीएस तळाने एका निवेदनात म्हटले आहे की, “अडीच वर्षांपूर्वी जैश-उल-आदल या संघटनेने त्यांच्या दोन सीमा रक्षकांना ओलीस ठेवले होते. आमच्या जवानांची सुटका करण्यासाठी मंगळवारी रात्री यशस्वी मोहीम राबवण्यात आली.” या कारवाईत दोन्ही जवानांची सुटका करण्यात आली. निवेदनानुसार सैन्य इराणमध्ये सुखरूप परत पाठविण्यात आले आहे. असे सांगितले जात आहे की, गुप्त माहितीच्या आधारे इराणच्या आयआरजीसीने पाकिस्तानमध्ये ही कारवाई केली आहे.मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाकिस्तानच्या कट्टरपंथी वहाबी दहशतवादी संघटनेने ‘जैश-उल-अदल’ या संस्थेने 16 ऑक्टोबर 2018 रोजी बलुचिस्तान प्रांतातील मेरकवा शहरात पाकिस्तानी हद्दीत 12 आयआरजीसी रक्षकाचे अपहरण केले होते. 15 नोव्हेंबर 2018 रोजी पाच सैनिकांना सोडण्यात आले. यानंतर 21 मार्च 2019 रोजी आणखी चार इराणी सैनिकांची पाकिस्तानी सैन्याने सुटका केली.

रिपोर्ट्सनुसार, बलुचिस्तान प्रांतात ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी इराणने सर्जिकल स्ट्राइकद्वारे आपल्या दोन सैनिकांना दहशतवादी संघटनेच्या ताब्यातून सोडवले.

Irans Surgical Strike on Pakistan

दरम्यान, जैश-उल-आदल ही घोषित दहशतवादी संघटना आहे. ही संघटना प्रामुख्याने आग्नेय इराणमध्ये सक्रिय आहे. या दहशतवादी संघटनेने इराणमधील अनेक नागरी आणि सैन्य तळांवर हल्ला केला आहे. या संघटनेने बलुचिस्तानमध्येही नरसंहार घडवून आणलेला आहे.

Irans Surgical Strike on Pakistan

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*