नाशिक : संपूर्ण अफगाणिस्तान तालिबानने कब्जात घेतल्यानंतर तेथे कट्टर इस्लामी राजवट लागू केली आहे. या मुद्द्यावर सर्व देशांनी निषेधात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. तरीदेखील एरवी प्रत्येक छोट्या-मोठ्या घटनेवर अविष्कार स्वातंत्र्याचा बडेजाव मिरवत मते व्यक्त करणारे भारतीय लिबरल्स मात्र तालिबानी राजवटीवर “शहामृगी पवित्रा” घेऊन गप्प बसले आहेत. आपल्या शेजारच्या देशात जणू काही घडलेच नाही. तेथील घटनेचा भारतावर काही परिणामच होणार नाही, असा आव त्यांनी आणला आहे. Indian liberals not uttering a single word over Taliban government in Afghanistan
भारतात मोदी सरकार आल्यानंतर अविष्कार स्वातंत्र्याचा गळा घोटला गेला, असा धोषा लावणाऱ्या या लिबरल्सनी अफगाणिस्तानातल्या तालिबान राजवटीत बद्दल एकही ट्विट केलेले नाही किंवा भारतीय मिडियात येणाऱ्या बातम्यां व्यतिरिक्त दुसरे एखादे ट्विट देखील केलेले नाही.
15 ऑगस्ट निमित्त बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने भारतीयांना स्वातंत्र्याचा खरा अर्थ समजावून सांगितला आहे. इतरांचा द्वेष यापासून मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य असा उपदेश तिने मोदीभक्तांना केला आहे, पण तालिबानी राजवटीबद्दल फक्त भारतीय मीडियात आलेल्या बातम्या तिने रिट्विट केल्या आहेत.
स्वरा भास्करने निदान एवढे तरी केले आहे. परंतु, भारतात मोदी राजवटीत राहणे असुरक्षित आहे असे म्हणणारा आमिर खान तालिबान राजवटीवर काहीही बोलायला तयार नाही. जावेद अख्तर, नसरुद्दीन शहा, रामचंद्र गुहा यांनी देखील तालिबानी राजवटीवर “ब्र” काढणारे ट्विट केलेले नाही.
भारतात मात्र मोदी राजवटीला अविष्कार स्वातंत्र्याचे उपदेश करण्यात आणि टीका करण्यात हे लेखक, विचारवंत, बॉलिवूड अभिनेते नेहमी धन्यता मानत असतात.
अफगाणिस्तानात तालिबानी राजवटीत महिलांवर हिजाबची बंधने लादण्यात आली आहेत. त्यांची कामे बंद करण्यात आली आहेत. त्या नोकरीवर जाऊ शकणार नाहीत. हे उघडपणे तालिबानने जाहीर केले आहे. कंदहारमध्ये अझिझी बँकेत घुसून तालिबानी सैनिकांनी नऊ महिलांचे काम बंद करून टाकले आहे. अशावेळी जगभरातून तालिबानच्या निषेधाचा सूर उमटला आहे. परंतु भारतीय लिब्रस मात्र “शहामृगा”सारखे वाळूत तोंडे खुपसून बसले आहेत…!!
आता त्यांना महिलांचे स्वातंत्र्य किंवा अविष्कार स्वातंत्र्य याची इस्लामी राजवटीने केलेली गळचेपी दिसत नाही किंवा अफगाणिस्तान हा परकीय देश आहे. परकीय देशाच्या अंतर्गत बाबींमध्ये किंवा व्यवहारांमध्ये आपण कसा हस्तक्षेप करायचा असा “विश्वामित्री पवित्रा” देखील त्यांनी घेतला आहे. या लिबरल्सच्या ट्विटर अकाऊंटवर तालिबान राजवटीविरोधात अद्याप तरी एकही ट्विट दिसलेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App