Taliban Income : जाणून घ्या तालिबानचे उत्पन्न किती, कोण पुरवतो शस्त्रे, कसा गोळा होतो पैसा, वाचा सविस्तर..

Afghanistan crisis Know About Taliban income sources how they make money Who Provides Them Arms

Taliban Income : तालिबानने अल्पावधीतच संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केले आहे. अमेरिकेचा पाठिंबा असूनही अफगाण सैन्याने गुडघे टेकले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होतोय की, तालिबानकडे एवढे पैसे आणि शस्त्रे कुठून येत आहेत? हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की, तालिबानचे वार्षिक उत्पन्न एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. गुप्तचर संस्थांच्या मते, तालिबान नेमके उत्पन्न किती आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे. Afghanistan crisis Know About Taliban income sources how they make money Who Provides Them Arms


विशेष प्रतिनिधी

काबूल : तालिबानने अल्पावधीतच संपूर्ण अफगाणिस्तान काबीज केले आहे. अमेरिकेचा पाठिंबा असूनही अफगाण सैन्याने गुडघे टेकले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न नक्कीच निर्माण होतोय की, तालिबानकडे एवढे पैसे आणि शस्त्रे कुठून येत आहेत? हे जाणून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल की, तालिबानचे वार्षिक उत्पन्न एक अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. गुप्तचर संस्थांच्या मते, तालिबान नेमके उत्पन्न किती आहे याचा अंदाज लावणे कठीण आहे.

तब्बल 1.5 अब्ज डॉलर्सचे वार्षिक उत्पन्न?

संयुक्त राष्ट्रांच्या जून 2021 च्या अहवालानुसार, तालिबानची वार्षिक कमाई 2011 पर्यंत सुमारे $ 300 दशलक्ष होती, जी अलिकडच्या वर्षांत वाढून 1.5 अब्ज डॉलर झाली आहे. तालिबानी ड्रग्जचा व्यापार करतात, त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रातून प्रचंड कर गोळा करतात आणि इतर अनेक गुन्हेगारी कृत्ये करतात, ज्यातून त्यांना हा पैसा मिळतो. एका गुप्तचर संस्थेचे म्हणणे आहे की, तालिबानला फक्त ड्रग्ज तस्करीमधूनच 460 मिलियन डॉलर्स मिळतात.

खाणकामातूनही कमाई

अहवालात म्हटले आहे की, तालिबान नेत्यांनी त्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्रातील नैसर्गिक संसाधनांमधूनही पैसे कमावले, ज्यात गेल्या वर्षी 464 मिलियन डॉलर्सचे खाणकाम होते. यावरून असे दिसून येते की तालिबानला लढाऊ सैनिकांची भरती करण्यासाठी, निधीसाठी किंवा शस्त्रास्त्र आणि दारूगोळ्यासाठीही संघर्ष करावा लागत नाही. तालिबान्यांना मोठ्या प्रमाणात देणग्याही मिळतात. ज्या संस्थांना ‘नॉन-गव्हर्नमेंट चॅरिटेबल फाउंडेशन नेटवर्क’ म्हणतात त्या संस्थांकडून त्यांना निधी दिला जातो. याशिवाय तालिबानला त्यांच्या श्रीमंत समर्थकांकडूनही प्रचंड पैसा मिळतो.

अमेरिकेचे रशियावर आरोप

व्हॉइस ऑफ अमेरिकेच्या अहवालानुसार, अमेरिकन अधिकारी अनेक वर्षांपासून सांगत आहेत की, रशिया तालिबानला शस्त्रे, पैसा आणि प्रशिक्षण देत आहे. यात कितपत तथ्य आहे, हे अद्याप समोर आलेले नाही. व्हीओआयच्या अहवालानुसार, अफगाणिस्तानातील अमेरिकन लष्कराचे तत्कालीन कमांडर जनरल जॉन निकोलसन यांनी 2018 मध्ये म्हटले होते की, रशिया अफगाणिस्तानात अमेरिकेची वर्षानुवर्षांची मेहनत वाया घालवत आहे. जेणेकरून अस्थिरतेबाबत अमेरिकेवर प्रश्न उपस्थित करता येतील.

पाकिस्तानकडूनही तालिबान्यांना पुरेपूर मदत

काही तज्ज्ञांच्या मते, तालिबानला पाकिस्तान आणि इराणकडून पैसे मिळतात. तथापि, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेण्यासाठी आधीच पैसा जमवला होता, असे सांगितले जात आहे. जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, अफगाणिस्तान सरकारने 2018 मध्ये 11 अब्ज डॉलर्स खर्च केले, त्यापैकी 80 टक्के परकीय मदतीच्या स्वरूपात आले. तर तालिबानने कोणत्याही मेहनतीशिवाय यापेक्षा जास्त पैशांची कमाई केली आहे.

Afghanistan crisis Know About Taliban income sources how they make money Who Provides Them Arms

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात