विशेष प्रतिनिधी
हेडिंग्ले : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्स येथील हेडिंगले येथे सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या दिवशी भारताचे सर्व फलंदाज केवळ ७८ धावा काढून बाद झाले. Indian Batman were bowled out for 78 Runs in the first day of the third cricket Test against England
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हेडिंग्ले येथील मैदानावर हा सामना सुरु आहे. सुरुवातीपासून फलंदाज चाचपडत खेळत होते. त्यामुळे सुरुवातच अडखळत झाली.
कर्णधार विराट कोहली बाद
जेम्स अँडरसन याच्या भेदक गोलंदाजीसमोर भारतीय फलंदाजांनी नांग्या टाकल्या. भारताने २१ धावांत तीन फलंदाज गमावले. कोहलीने चेंडू फटकावताना चुकला आणि विकेट गमावली. अवघ्या सात धावा असताना त्याला यष्टीरक्षक जोस बटलरने झेलबाद केले.
दुसरी विकेट चार धावांवर पडली
राहुल नंतर जेम्स अँडरसनने चेतेश्वर पुजाराला बाहेरचा रस्ता दाखविला.चेतेश्वर पुजाराला या सामन्यात मोठ्या आशा होत्या. फक्त एक धाव केल्यानंतर सर्वोत्तम आउट-स्विंगर चेंडू त्याच्या बॅटला चाटून गेला आणि यष्टीरक्षकाच्या ग्लोव्हजमध्ये अडकला.
भारताची खराब सुरुवात
भारताच्या पहिल्या डावाची सुरुवात अत्यंत खराब झाली.षटकाच्या पाचव्या चेंडूवर राहुलने जेम्स अँडरसनचा चेंडू फाटकावण्याच्या नादात जोस बटलरच्या हाती झेल दिला आणि भारताला मोठा धक्का बसलाल. राहुल ४ चेंडू खेळून खाते न उघडता तंबूत परतला.
नाणेफेक जिंकल्यानंतर कोहली आश्चर्यचकित
विराट कोहलीने नाणेफेक जिंकली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आश्चर्य होते. वास्तविक कोहलीने सलग ८ वेळा नाणेफेक हरला. यावेळी नाणेफेक जिंकली. मात्र, कोहलीसाठी त्यात एक अनपेक्षित योगायोगही आहे. लीड्सच्या या मैदानावर नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला अनेकदा पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या पाच कसोटी सामन्यांमध्ये ज्या संघाने नाणेफेक जिंकली आहे, ती हरली आहे.
भारताचा संघ
रोहित शर्मा, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (wk), रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
इंग्लंडचा संघ
रोरी बर्न्स, हसीब हमीद, डेव्हिड मलान, जो रूट (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, जोस बटलर (wk), मोईन अली, सॅम कुरन, क्रेग ओव्हरटन, ओली रॉबिन्सन, जेम्स अँडरसन.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App