काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंगच यांच्याच पाठिशी, बंडखोरांची मागणी फेटाळली


विशेष प्रतिनिधी

अमृतसर – काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी पंजाबात मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यामागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षी होणारी विधानसभेची निवडणूक देखील कॅप्टन यांच्या नेतृत्वाखालीच लढली जाईल असे स्पष्ट निर्देश पक्षप्रभारी हरीश रावत यांनी दिले आहेत. Cong backs capt. Amrindarsingh

नवज्योतसिंग सिद्धू यांना देखील त्यांच्या सल्लागारांवर नियंत्रण ठेवण्यास सांगण्यात आले असून त्यांच्याशी काँग्रेस पक्षाला काहीही देणेघेणे नाही, राष्ट्र हिताविरोधातील कोणतेही वक्तव्य सहन केले जाणार नाही असे रावत यांनी म्हटले आहे.प्रदेश पातळीवरील पाच बड्या नेत्यांनी आज रावत यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्या हकालपट्टीची मागणी केली पण ती रावत यांनी फेटाळून लावली. काँग्रेसचे नेते प्रगटसिंग, मंत्री सुखजिंदर रंधावा, तृप्त राजेंद्र सिंग, चरणजितसिंग आणि सुखविंदरसिंग यांनी डेहराडूनमध्ये रावत यांची भेट घेतली. हीच मंडळी काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे पंजाबमधील ३४ आमदारांनी अमरिंदरसिंग यांच्या नेतृत्वाला विरोध केला आहे.

Cong backs capt. Amrindarsingh

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*