Positive news : पुण्याच्या रिक्षाचालकांची “जुगाड अँब्युलन्स” ऑक्सिजनसह पुणेकरांचा सेवेत;डॉ. केशव क्षीरसागर यांच्या पुढाकारातून उपक्रम


वृत्तसंस्था

पुणे – पुणे आणि पुण्याचे टांगेवाले… पुणे आणि पुण्याचे रिक्षावाले हे नेहमी खिल्ली पुण्याबाहेरच्या लोकांचा खिल्ली उडविण्याचा विषय राहिले आहेत. पण याच पुण्यातल्या रिक्षावाल्यांनी एकत्र येऊन एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे आणि कोरोनाच्या संकटकाळात तो पुणेकरांसाठी मोठा उपकारक ठरतो आहे. in pune riksha ambulance

पुण्याच्या रिक्षाचालकांनी एकत्र येऊन जुगाड अँब्युलन्स नावाचा उपक्रम सुरू केला आहे. हे रिक्षाचालक आपल्या रिक्षात ऑक्सिजन सिलिंडर आणि अन्य वैद्यकीय सुविधा ठेवतात आणि गरजू रूग्णांना रूग्णालयापर्यंत पोहोचेपर्यंत मदत करत राहतात. डॉ. केशव क्षीरसागर यांनी या उपक्रमासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी रिक्षाचालकांसह एकत्र येऊन या रिक्षांना जुगाड अँब्युलन्स असे नाव दिले आहे.लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळविण्यासाठी बरेच कष्ट पडतात. पेशंटची इमर्जन्सी असते. त्यांना ताबडतोब ऑक्सिजनची गरज असते. अशा पेशंटना ऑक्सिजन मिळावा यासाठी सध्या तीन रिक्षांमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात आली आहे. रिक्षाचालकांना ऑक्सिजन लावण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. तसेच त्यांना तातडीच्या सेवेसाठी उपयुक्त ठरेल असे प्रशिक्षणही देण्यात आले आहे. यातून पेशंटना लाभ मिळतो आहे, असे डॉ. केशव क्षीरसागर यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.

रिक्षाचालकांचा ग्रुप तयार करून एक हेल्पलाइन नंबरही शेअर करण्यात आला आहे. त्यावर पेशंट किंवा नातेवाईक संपर्क करू शकतात. रिक्षाचालकांना कोविड पेशंटच्या वाहतूकीच्या वेळी घ्यायच्या काळजीची पुरेशी माहिती देण्यात आली आहे, असे डॉ. क्षीरसागर यांनी स्पष्ट केले आहे.

in pune riksha ambulance

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण