घाबरू नका ! असा ओळखा Mucormycosis ! जाणून घ्या आयसीएमआरने सांगितलेली लक्षणं आणि कारणं


  • कोविडमधून बरे झालेल्या काही रुग्णांत ‘म्युकोरमायकोसिस’ हे ‘फंगल इन्फेक्शन’ आढळत आहे. ते नवीन नाही; परंतु हल्ली कोरोनामुळे प्रतिकारशक्ती तसेच उपचारादरम्यान स्टिरॉईड्सचा मारा यामुळे अनियंत्रित मधुमेहातील रुग्णांमध्ये ‘म्युकोरमायकोसिस’ हा बुरशीजन्य आजार वाढत आहे.Identify Mucormycosis! Learn what ICMR says Symptoms and causes

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशभरात  म्युकोरमायकोसिसचे रूग्ण वाढत आहेत . या पार्श्वभूमीवर आयसीएमआरने या आजारासंबंधी घ्यायची काळजी आणि उपचार पद्धती याबाबत एक पत्रक जाहीर केलं आहे. कोरोना झालेल्या लोकांना म्युकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशी हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. मधुमेही रूग्णांना कोरोना झाल्यास त्यांनाही कोरोना होण्याची शक्यता जास्त असते. अशात आयसीएमआरने नेमकं काय म्हटलं आहे वाचा सविस्तर .Identify Mucormycosis! Learn what ICMR says Symptoms and causes

काय आहे हा आजार?

म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य संसर्ग असून त्याची लागण प्रामुख्याने औषधोपचार सुरू असलेल्या व्यक्तींना होते.

श्वास घेताना बुरशीचे बीजाणू अशा व्यक्तींच्या शरीरात गेले तर त्याचा विपरीत परिणाम हा त्यांच्या सायनस किंवा फुफ्फुसांवर होतो.

यामुळे गंभीर स्वरूपाचा आजार होण्याची शक्यता असते. ज्याची धोक्याची चिन्हं आणि लक्षणं अशी आहेत

डोळे आणि नाकाभोवती वेदना होणे व ती जागा लालसर होणे

ताप येणे,डोकं दुखणं,खोकला येणं,धाप लागणे,रक्ताच्या उलट्या होणे,संभ्रम निर्माण होणे

म्युकरमायकोसिसची होण्याची कारणे ?

अनियंत्रित मधुमेह

स्टेरॉईडमुळे कमकुवत झालेली रोगप्रतिकारशक्ती

आयसीयूमध्ये प्रदीर्घ वास्तव्य

सहव्याधी – प्रत्यारोपणानंतर/ट्यूमर वा कर्करोगाची बाधा

व्हेरिकॉनझोलचे उपचार

म्युकरमायकोसिसचा प्रतिबंध कसा करावा?

धूळ असलेल्या बांधकामाच्या जागांवर जाताना मुखपट्टीचा म्हणजेच मास्कचा वापर करावा

मातीकाम करताना, खासकरून बागकाम करताना शेवाळ किंवा खत हाताळताना बूट, लांब पँट, लांब हाताचे शर्ट आणि हातमोजे घालावेत.

शारीरिक स्वच्छता राखावी, विशेषतः अंघोळ करताना शरीर व्यवस्थित घासावे

निदान कधी करावं?

सानसायटीस-नाकपुड्या बंद होणे वा चोंदणे, नाकातून स्त्राव काळसर/रक्ताळलेला वाहणे, गालाच्या हाडावर वेदना होणे.

चेहऱ्याच्या एका बाजूला वेदना होणे, मुंग्या येणे किंवा सूज येणे

नाकावर / टाळूवर काळसर डाग पडणे.

दातदुखी, दात हलणे, जबडा दुखणे.

वेदनेसह अंधुक दिसणे वा दोन प्रतिमा दिसणे, ताप येणे, त्वचेवर जखम होणं, रक्त गोठणे, खपली पडणे

छातीत दुखणे,छातीत पाणी होणे, हिमॉप्टिसिस, श्वसनसंस्थेशी निगडी लक्षणांची तीव्रता वाढणे

Identify Mucormycosis! Learn what ICMR says Symptoms and causes

काय काळजी घ्याल?

रक्तामधली अति प्रमाणातील शर्करा नियंत्रित करणं

कोव्हिड 19 संसर्गातून बऱ्या झालेल्या तसेच मधुमेह असलेल्या व्यक्तींनी रक्तातील शर्करेचे प्रमाणावर लक्ष ठेवावं

स्टेरॉईड्सचा योग्य वापर, योग्य वेळी, योग्य मात्रेत आणि योग्य कालावधीत तो वापर करावा.

ऑक्सिजन थेरेपी सुरू असताना ह्युमीडियाफरमध्ये स्वच्छ, निर्जंतुकपणे केलेले पाणी वापरावे

प्रतिजैविके, बुरशी विरोधी औषधांचा योग्य वापर

कोणत्याही धोक्याच्या चिन्हांकडे व लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका

खास करून कमजोर रोगप्रतिकारशक्ती असलेल्या व्यक्तींनी वा रोगप्रतिकारशक्ती वाढवणारी औषधं घेतलेले कोव्हिड 19 बाधितांनी बुरशीजन्य सायनासायटिसमुळे नाक चोंदले आहे असे समजू नये.

बुरशीजन्य संसर्ग झाल्याने निदान व्हावं यासाठी योग्य चाचण्या KOH स्टेनिंग व मायक्रोस्कोपी, कल्चर, माल्डी-टीओफ करून घेण्याकडे दुर्लक्ष करू नका.

म्युकरमायकोसिसचे उपचार सुरू करण्यासाठी वेळ वाया घालवू नका.

मधुमेह आणि त्यातून गुंतागुंत नियंत्रित करणं आवश्यक आहे

स्टेरॉईड्स लवकरात लवकर थांबवण्याचा हेतू बाळगून कमी करावीत

बुरशी विरोधी औषधोपचारांची आवश्यकता नाही

Identify Mucormycosis! Learn what ICMR says Symptoms and causes

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात