उत्तराखंडमध्ये साकारतेय देशातील सर्वाधिक उंचीवरील पहिलेच हर्बल पार्क

विशेष प्रतिनिधी

डेहराडून – उत्तराखंडमधील चामौली जिल्ह्यात मना खेड्यामध्ये अकरा हजार फूट उंचीवर भव्यदिव्य हर्बल पार्क उभारले जात आहे. देशातील हे सर्वात उंचावरील हे पहिलेच पार्क असेल. विशेष म्हणजे मना या खेड्याला लागूनच बद्रिनाथाचे प्रसिद्ध मंदिर आहे. या मंदिराशेजारी हे उद्यान साकार होत आहे. Herbal Park will started in Uttarkhand

या उद्यानामध्ये चाळीस विविध प्रकारच्या वनौषधी पाहायला मिळतील. हा सगळा हिमालयाचा परिसर असल्याने या भागांमध्ये आळून येणारी वृक्षसंपदा येथे पाहायला मिळेल.



या उद्यानाचे चार भागांत विभाजन करण्यात आले आहे. पहिल्या विभागात बद्रिनाथाशी संबंधित वनस्पतींचा समावेश असेल. त्यात प्रामुख्याने बद्री तुळस, बद्री बोप, बद्री वृक्ष आणि भोजपत्र यांचा समावेश असेल. विष्णूला अर्पण केल्या जाणाऱ्या बद्री तुळशीचे अनेक फायदे असून विविध औषधांमध्ये तिचा वापर केला जातो. बद्री बोर हे फळ उच्च पोषणमुल्यांसाठी प्रसिद्ध आहे.

विभागामध्ये ब्रह्मकमळ (उत्तराखंडचे राज्य पुष्प), फेमकमळ, निलकमळ आणि कूट यांचा समावेश आहे. चौथ्या विभागामध्ये अतीश, मिथाविष, वनकाकडी आणि चोरू यांचा समावेश असेल. याशिवाय थुनेर वृक्षांचीही येथे लागवड करण्यात येईल. याचा कर्करोगावरील औषधांच्या निर्मितीसाठी वापर होतो. तानसेन आणि मॅपलची झाडे देखील या ठिकाणी लावण्यात येतील.

Herbal Park will started in Uttarkhand

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात