Uttarakhand’s Chamoli Glacier burst LIVE: भारतीय सैन्याकडून बचाव कार्य सुरू, 600 सैनिक दिल्लीहून मदतीसाठी ;पंतप्रधान मोदींनी साधला उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद


विशेष प्रतिनिधी

चामोली : उत्तराखंडमधील या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी फोनवरुन संवाद साधला. याशिवाय, त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशीही चर्चा केली. अधिकारी युद्धपातळीवर काम करत असून नागरिकांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.Uttarakhand’s Chamoli Glacier burst 

अमित शहा यांनी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि मदतीचं आवाहन केलं आहे. यानंतर तात्काळ NDRF च्या काही टीम्स दिल्लीवरून रवाना झाल्या आहेत.

चमोली भागात 100 ते 150 लोक दगावल्याची भीती : उत्तराखंड चीफ सेक्रेटरी

उत्तराखंडचे चीफ सेक्रेटरी ओमप्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार, चमोली गावातील 100 ते 150 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत हे चमोली इथं पोहोचले असून जोशीमठला इथंही गेले. भारतीय सैन्य आणि आयटीबीपीच्या जवानांनी मुख्यमंत्री रावत यांना तपोवनमधील पूर परिस्थितीची माहिती दिली 

चामोली जिल्ह्यातील हिमस्खलनानंतर ॠषीगंगा जलविद्युत प्रकल्प पूर्णपणे उध्वस्त झाला आहे, तर धौलीगंगावरील जलविद्युत प्रकल्प तुटल्याने गंगा व त्यावरील सहायकांना धोका निर्माण झाला आहे. हे पाहता राज्यातील चामोली ते हरिद्वारपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जेंव्हा हा अपघात झाला तेव्हा मोठ्या प्रमाणात कामगार दोन्ही प्रकल्पांवर काम करत होते. या अपघातात सुमारे दीडशे लोक बेपत्ता असल्याचा संशय आहे, तर दोन लोकांचे मृतदेह आढळले नोंद आहे. मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत सातत्याने या घटनेवर नजर ठेवून आहेत. त्रिवेंद्रसिंग रावत यांनी जोशीमठ गाठले आहेत. त्यांनी येथील घटनास्थळी भेट दिली व संपूर्ण माहिती घेतली. कर्णप्रयाग येथे पाणी पोहोचले आहे.

Uttarakhand’s Chamoli Glacier burst

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती