लग्न लागल्यावर काही काही तासातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आवळगाव येथे घडली. या करुण घटनेने लोकांना धक्का बसला आहे. Grooms death on the day of marriage
विशेष प्रतिनिधी
चंद्रपूर : लग्न झाल्यावर एका तासातच नवरदेवाचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील आवळगाव येथे घडली. या करुण घटनेने लोकांना धक्का बसला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील वासेरा येथील नाजूक पोहनकर यांचा विवाह ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगाव येथील दीपाली नामक युवतीशी गुरुवारी ठरला होता. नाजूक हे मोजकेच वऱ्हाडी घेऊन लग्नासाठी आवळगावला आले होते.
सकाळी 11.30 वाजता आनंदी वातावरणात नाजूक व दीपालीचा विवाह सोहळा पार पडला. दुपारी तीन वाजताच्या दरम्यान रितीरिवाजानुसार नवरदेव वधूला स्वगावी नेण्यासाठी वधूसह मोटारीत बसला. त्यावेळी अचानक नवदेवाची प्रकृती बिघडली. लगेच उपचारासाठी ब्रह्मपुरीला हलविण्यात आले .
डॉक्टरने त्यांना गडचिरोली जिल्ह्यातील आरमोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात हलविण्याचा सल्ला दिला. ब्रह्मपुरी वरून आरमोरीला नेत असता रस्त्यातच नवरदेवाची प्राणज्योत मालवली. ही वार्ता एकताच सहजीवनाचे स्वप्न रंगवत असलेल्या दीपालीच्या स्वप्नांचा क्षणात चुराडा झाला.
इतर बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App