विशेष प्रतिनिधी
पानीपत : वयाच्या 11-12 व्या वर्षी नीरज चोप्राचे वजन 80 किलो असायचे. तो गावात कुर्ता घालून बाहेर आला की मुले त्याला सरपंच म्हणवून चिडवायचे. बालपणीचा तोच लठ्ठ सरपंच आज जगातील सर्वोत्तम भाला फेकणारा बनला. ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. नीरज अभिनव बिंद्रा नंतर वैयक्तिक स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा दुसरा भारतीय ठरला आहे.GOLDEN BOY NEERAJ CHOPRA: Surma likes Churma! The mother chanted and fasted all day … said something very special about the child
नीरजचा जन्म 24 डिसेंबर 1997 रोजी हरियाणाच्या पानिपत जिल्ह्यातील खंड्रा गावात एका छोट्या शेतकऱ्याच्या घरी झाला. नीरजने चंदीगडमधून शिक्षण घेतले.
मां सरोज –फेक जहाँ तक भाला जाए …
मुलगा नक्कीच जिंकेल असे नीरजची आई सरोजने सांगीतले होतेच . त्याच्यासाठी त्यांनी दिवसभर जप उपवास अन् पूजा केली. नीरजला पाहून आता गावातील मुलांनी भाले बाळगण्यास सुरुवात केली आहे. आज संपूर्ण देशाला माझ्या मुलाचा अभिमान आहे .मला माझ्या मुलावर गर्व आहे .त्याला गोड खूप आवडतं विशेष करून चुरमा .मी त्याला रोज चुरमा खाऊ घालते आताही तो आल्यावर मला चुरमाच मागनार .
माझ्या निरजमुळे गावातील प्रत्येक मुलगा आता भाला उचलतोय ..निरजला आई सांगते फेक जहाँ तक भाला जाए …
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App