किप ऑन रोलिंग क्लबमधील बारामती येथील ५ मुलांनी आपली जबरदस्त कामगिरी दाखवत बारामती तालुक्याचे नाव उंचावले आहे.Goa: Five competitors from Baramati won the title in the skating competition held in Panaji, raised the name of the taluka
विशेष प्रतिनिधी
गोवा : गोव्यामधील पणजी येथे स्केटिंग स्पर्धा पार पडली.राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेसाठी बारामतीमधून सात खेळाडू पणजीला गेले होते. तर या सात खेळाडूंपैकी पाच जणांनी यशाच्या शिखरावर धाव घेतली. किप ऑन रोलिंग क्लबमधील बारामती येथील ५ मुलांनी आपली जबरदस्त कामगिरी दाखवत बारामती तालुक्याचे नाव उंचावले आहे.
या पाच खेळाडूंची नावे अधिराज बर्गे, रिद्दीश कुंभार, दक्षता आतर्डे, निशांत आर्डे आणि सिया गांधी आहे.या पाचही खेळाडूंना राष्ट्रीय स्केटिंग स्पर्धेकरता बारामती येथील किप ऑन रोलिंग क्लबचे कोच सचिन शहा यांनी योग्य ते मार्गदर्शन केले.स्केटिंग स्पर्धेत अधिराज बर्गे, रिद्दीश कुंभार, दक्षता आतर्डे या तीन खेळाडूंनी सुवर्णपदक पटकावले आहे.तर निशांत आर्डे आणि सिया गांधी त्यांनी कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App