आपण जे मोठ्याने उच्चार करून एकमेकांशी बोलतो ती वैखरी वाणी आहे. ऐकलेल्या आणि वाचलेल्या ज्ञानाचे चिंतन आणि मनन करतो ती मध्यमा वाणी आहे. या मध्यमा वाणीनेच आपल्याला ज्ञान आत्मसात करण्याचे सामर्थ्य येते. म्हणजे मग आपल्याला स्वतंत्र विचार आणि रचना सुचायला लागतात. ती पश्यन्ति वाणी आहे. सरतेशेवटी परावाणीमुळे सारे ज्ञानच आपल्याकडे ओढीने येते आणि आपल्याकडून चिरंतन टिकणारे साहित्य निर्माण होऊ शकते.Give shape to your own personality in the current competition
आपल्या व्यक्तीमत्व विकासासाठी या फार पोषक बाबी आहेत हे नेहमी लक्षात ठेवा. ज्यांना चौरचौघांत आपले व्यक्तीमत्व वेगळे ठसवायचे असेल त्यांनी काही बाबी जरूर केल्या पाहिजेत. समजा उदाहरणादाखल जेव्हा तुम्हाला परकी भाषा ज्या वेळी आत्मसात करायची असते त्यावेळी त्या भाषेच्या उच्चाराकडे लक्ष ठेवायला हवे. ज्यांना नवीन काही शिकायचे आहे त्यांनी सर्वांत प्रथम एक गोष्ट शिकली पाहिजे ती म्हणजे ऐकायला शिकणे. लहानपणी कविता आणि भाषणे पाठ करून म्हणावी लागत.
त्याचा भाषेच्या दृष्टीने फार मोठा फायदा होतो. जे पाठांतर केलेले असेल तेसुद्धा अधूनमधून परत मोठ्याने उच्चार करीत म्हणायचे असते. म्हणजे मेंदूचा तो विभाग परत कार्यान्वित होऊन सक्षम राहतो. याला आवृत्ती करणे असे म्हणतात. यात एक प्रकारे आपण आपलेच ऐकत असतो. ज्यांना अनेक लोकांशी बोलण्याचे प्रसंग येतात, त्यांनी तर हे मोठ्याने वाचण्याचे व्रतच घ्यायला हवे. अर्थात सगळे वाचन तसे करण्याची आवश्यकता नाही. पण ज्या भाषेत आपल्याला व्याख्यान देण्याचे प्रसंग येतात,
त्या भाषेतल्या थोर व्यक्तींच्या भाषणातले उतारे रोज पाच दहा मिनिटे तरी मोठ्याने वाचण्याची सवय लावून घ्यावी. भाषणे जी असतात ती असंख्य श्रोत्यांना आपले म्हणणे नीट समजावे या हेतूने त्या त्या व्यक्तींनी केलेली असतात. त्यामुळे ते मुद्दे आपल्याही विचारधारेत सहज उतरतात. अभ्यासाच्या दृष्टीने आपण वाचलेले मुद्दे इतरांना समजावून सांगणे आणि त्यांच्याबद्दल चर्चा करणे ते ज्ञान आत्मसात करण्यासाठी खूप उपयोगी ठरते. यातूनच व्यक्तीमत्व विकास घडतो.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App