गलवान खोऱ्यातील हिंसाचार पध्दतशीर कट रचून, अमेरिकन आयोगाचा निष्कर्ष

  • चिनी सैन्याने पद्धतशीरपणे कट रचून भारतीय सैनिकांबरोबर गलवान खोऱ्यात हिंसाचार केल्याचा निष्कर्ष अमेरिकन आयोगाने काँग्रेसला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये दिला आहे.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : चिनी सैन्याने पद्धतशीरपणे कट रचून भारतीय सैनिकांबरोबर गलवान खोऱ्यात हिंसक संघर्ष केला,असा निष्कर्ष अमेरिकन आयोगाने काँग्रेसला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये दिला आहे. जून महिन्यात गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये हिंसक चकमक झाली होती. galwan valley news

यात भारताचे २० जवान शहीद झाले तर चिनी सैनिकही ठार झाले होते. भारत-चीनमध्ये नियंत्रण रेषेवर आठ महिन्यांपासून सुरु असलेला सीमावाद मागच्या काही दशकातील गंभीर सीमावाद आहे असे अमेरिका-चीन आर्थिक आणि सुरक्षा आढावा आयोगाच्या अहवालात म्हटले आहे. galwan valley news

चीनने आधीपासूनच या संघर्षाची तयारी केली होती, असे काही पुराव्यांवरुन संकेत मिळत आहेत. या संघर्षाच्या काही आठवडेआधी चीनचे संरक्षणमंत्री वी यांनी स्थिरतेसाठी लढाई लढण्याला प्रोत्साहन दिले होते. याचे दाखले रिपोर्टमध्ये देण्यात आले आहेत.

उपग्रह फोटोंद्वारे मिळालेल्या पुराव्यानुसार, चीनने गलवान खोऱ्यात मोठया प्रमाणावर सैन्याची जमावजमव केली होती. घटनेच्या आठवडाभर आधीपासून जवळपास १ हजार चिनी सैनिक तिथे होते. गलवान घटनेच्या दोन आठवडेआधी चिनी सरकारचे मुखपत्र असलेल्या ग्लोबल टाइम्समधून तणाव वाढवण्याचे संकेत देण्यात आले होते.

galwan valley news

भारत आणि चीनमधला तणाव अजूनही कायम आहे. दोन्ही बाजूचे ५० हजारच्या आसपास सैनिक पूर्व लडाख सीमेवर तैनात आहेत. रणगाडे, फायटर विमाने, क्षेपणास्त्र दोन्ही बाजूंनी सज्ज ठेवली आहेत. चीन मागे हटत नसल्याने अखेर भारतीय सैन्याने दक्षिण पँगाँग किनाऱ्यावरच्या महत्त्वाच्या टेकडया ताब्यात घेतल्या. रणनितीक दृष्टीने भारताला त्यामुळे चीनवर बाजी मारता आली.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात