विशेष प्रतिनिधी
यवतमाळ: महागाव तालुक्यातील फुलसावंगी येथील इब्राहिम (वय २४) याने चक्क हेलिकॉप्टर बनविले होते. दोन वर्षापासून इस्माईने हेलिकॉप्टर बनविण्यासाठी कष्ट घेतले होते.त्याचे स्वप्न पूर्ण होण्याच्या मार्गावर होते. परंतु, हेलिकॉप्टर ट्रायल दरम्यान त्याचा मृत्यू झाला. Fulsawangi’s Rancho dies in helicopter Test, two years of hard work, dreams shattered
इस्माईलचे शिक्षण आठवीपर्यंत झाले होते. पण एक दिवस त्याने चक्क हेलिकॉप्टर बनवायचे ठरवले. स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी त्याचा प्रवास सुरु झाला. हळूहळू एक एक पार्ट तो तयार करू लागला. तब्बल दोन वर्षाच्या प्रयत्नानंतर त्याचे स्वप्न पूर्ण होणार होते. त्यान हेलिकॉप्टरची ट्रायल घेण्यास सुरुवात केली.
पण, अचानक हेलिकॉप्टरचा मागचा फॅन तुटला आणि तो मुख्य फॅनला येऊन धडकला. तेव्हा तो फॅन इस्माईलच्या डोक्यात लागला.डोक्यावर फॅन लागल्याने इस्माईलचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसराला शॉक बसला असून आणि हेलिकॉप्टर बनविण्याचे त्याचे स्वप्न भंगले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App