सकारात्मक ! भारत छोड़ो आंदोलनातील प्रख्यात गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी दोरेस्वामी यांची कोरोनावर मात ; वय वर्ष १०३


  •  प्रख्यात गांधीवादी स्वातंत्र्य सेनानी हारोहल्ली श्रीनिवासैया दोरेस्वामी यांनी कोविड -१९ विषाणूचा पराभव केला आहे . 

  • ते १०३ वर्षांचे आहेत . बरे झाल्यानंतर त्यांनी सांगितले की, मला श्वास घेण्यास त्रास होत होता आता मी एकदम बरा आहे .

वृत्तसंस्था

बंगळूर : देशात कोरोनाच्या बातम्यांनी मन सुन्न होत असताना काही आशेचे किरणही समोर येताना दिसत आहेत.सकारात्मक घटना देखील घडत आहेत .कोरोनाला घाबरण्यापेक्षा लढा देणे महत्वाचे असते .आता  १०३ वर्षांच्या स्वातंत्र्य सैनिकांनी (Freedom Fighter) कोरोनाला हरवले आहे. ते रुग्णालयातून उपचार घेऊन घरी परतले असून, त्यांच्या इच्छाशक्तीचे सगळीकडून कौतुक होत आहेत. freedom fighter H S Doreswamy won battle against covid 19

एच.एस.दोरेस्वामी हे १०३ वर्षांचे आहेत. ते प्रख्यात गांधीवादी नेते असून, स्वातंत्र्यसैनिक आहेत. दोरेस्वामी यांना ५ दिवसांपूर्वी कोरोनाची लक्षणे जाणवू लागली. त्यांना श्वसनास त्रास होऊ लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते .त्यांना आता रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

दोरेस्वामी यांना श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्च या स्वायत्त सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयाचे संचालक डॉ.सी.एन.मंजुनाथ हे प्रख्यात हृदयरोगतज्ञ आणि माजी पंतप्रधान एच.डी.देवेगौडा यांचे जावई आहेत. त्यांनीच दोरेस्वामी यांच्यावर उपचार केले.

दोरेस्वामी यांचा जन्म १० एप्रिल १९१८ रोजी झाला. दोरेस्वामी भारत छोडो चळवळ आणि विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत भाग घेतल्याबद्दल ओळखले जातात.  अनेक दशकांपासून कर्नाटकमधील नागरी समाज चळवळींमध्ये परिचित व्यक्ती देखील आहेत .
बेंगळुरुमधील तलाव पुनरुज्जीवित करण्यासाठीही ते ओळखले जातात.

ते बंगळूरमधील एका शाळेत भौतिकशास्त्र आणि गणिताचे शिक्षक होते . महात्मा गांधी यांच्या आवाहनानंतर जून १९४२  मध्ये दोरेस्वामी स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले. अवघ्या सहा महिन्यांत त्यांना अटक करण्यात आली. १९४३ मध्ये त्यांची सुटका झाली तेव्हा ते स्वातंत्र्य चळवळीत सामील झाले.

चले जाव चळवळीत त्यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांना १९४३ ते १९४४ या दरम्यान १४ महिने कारावास झाला होता. गांधीवादी असलेले दोरेस्वामी म्हैसूर चलो या चळवळीतही सहभागी झाले होते. म्हैसूर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन करण्यासाठी ही चळवळ करण्यात आली होती. आताही अनेक आंदोलनात दोरेस्वामी यांचा सक्रिय सहभाग असतो.

freedom fighter H S Doreswamy won battle against covid 19

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण