कोरोना रुग्णांकरिता “आयुष ६४” आयुर्वेदिक औषधाचे नि;शुल्क वितरण


प्रतिनिधी

मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, मुंबई महानगरच्यावतीने कोरोना रुग्णांकरिता आयुष ६४ औषधाचे नि:शुल्क वितरण करण्यात येत आहे. “आयुष ६४” हे सी.सी.आर.एस. आयुष मंत्रालयाद्वारा प्रमाणित औषध आहे. Free distribution of AYUSH 64 Ayurvedic medicine for Corona patients

आयुष ६४ हे आयुर्वेदिक औषध असून या औषधाच्या सेवनाने कोरोना रुग्ण लवकर बरा होतो. रुग्णांनी कोरोना संबंधित सुरु असलेली औषधे बंद न करता डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच ही औषधे घ्यायची आहेत.   १८ ते ६० या वयोदरम्यान असलेल्या कोरोना रुग्णांनाच हे औषध घ्यायचे  असून  कोरोना गर्भवती किंवा स्तनपान मातांना या औषधाचे सेवन करता येणार नाही.



जनकल्याण समितीने मुंबईत विविध २० ठिकाणी वितरण केंद्र स्थापन केले आहे. औषध मिळविण्यासाठी कोरोना रुग्णाला ७ दिवसांपूर्वीच्या पॉझीटिव्ह रिपोर्ट ची झेरॉक्स प्रत, आधार कार्डाची प्रत तसेच कोरोना रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकाचा मोबाईल नंबर देणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी संजय माळकर – 9220822334 किंवा सहदेव सोनावणे – 9967897850 यांच्याशी संपर्क साधावा.

Free distribution of AYUSH 64 Ayurvedic medicine for Corona patients

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात