प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि मंत्री नबाब मलिक यांनी फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन ही नावे घेऊन राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोचे वरिष्ठ अधिकारी समीर वानखेडे वानखेडे यांच्याशी त्यांचे नेमके संबंध काय?, असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे हे फ्लेचर पटेल आणि लेडी डॉन नेमके आहेत कोण? या प्रश्नावर सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू झाली आहे Fletcher Patel came in front of the media; I am a former soldier
समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेल संबंध काय आहेत? ड्रग्जच्या तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असै सवाल मलिकांनी केले. त्यावर आता प्लेचर पटेल यांनीच मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिक यांनी ट्विट करून फ्लेचर पटेल यांच्यावर ‘त्यांचे एनसीबीशी काय संबंध आहेत? आणि फ्लेचर पटेल हे कुणाला ‘माय लेडी डॉन’ म्हणतात?’, अशी विचारणा केली होती. त्यानंतर फ्लेचर पटेल हे माध्यमांसमोर आले. आपण माजी सैनिक आहोत आणि ड्रग्सपासून तरूणांना सुरक्षित करण्यासाठी समीर वानखेडे यांना मदत करतो. तसेच समीर वानखेडे यांची बहिण यास्मीन वानखेडे आहेत, त्या समाज कार्य करतात, म्हणून त्यांच्याशी ओळख आहे. नवाब मलिकांनी माझ्यावर आरोप करून सैन्याची बदनामी करू नये, असे ते म्हणाले.
– नवाब मलिक म्हणाले…
नवाब मलिक यांनी मुंबई ड्रग्स प्रकरणात आता एनसीबी अधिकारी समीन वानखेडे यांच्यावर अजून एक आरोप केला. यावेळी मलिक यांच्याकडून फ्लेचर पटेल यांचे नाव समोर आणले आहे. समीर वानखेडे आणि फ्लेचर पटेलशी संबंध काय आहे? तीन केसेसमध्ये फ्लेचर पटेल पंच कसे? फॅमिली फ्रेंडला पंच म्हणून घेण्यामागचा वानखेडेंचा हेतू काय? असा सवाल मलिकांनी केला. आता प्लेचर पटेल यांनीच मलिकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले.
– फ्लेचर पटेल म्हणाले…
मी एक माजी सैनिक आहे. एनसीबी आणि समीर वानखेडे हे खूप मोठे आणि चांगले काम करत आहेत. म्हणून सैनिक फेडरेशन मुंबई अध्यक्ष म्हणून वानखेडे यांना एनसीबीला मदत करत असतो. देशात ड्रग्स आणून तरुण पिढीला ड्रग्स अॅडिक्ट केले जात आहे. ते रोखण्याचे काम एनसीबी करत आहे. म्हणून मी त्यांना मदत करत आहे, असे फ्लेचर पटेल यांनी म्हटले.
समीर वानखेडे यांना फक्त मीच नाही तर पूर्ण देश ओळखतो. फोटोमध्ये लेडी डॉन म्हणून आहेत. त्या मोठ्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. म्हणून आदराने त्यांना लेडी डॉन असे मी म्हणतो. त्यांनी कोविड काळात महत्वाचे काम केले. त्या समीर वानखेडेंच्या थोरल्या बहीण अॅड. यास्मिन वानखेडे आहेत. समीर वानखेडे, एनसीबीची दहशत गुन्हेगारांच्या मनात असलीच पाहिजे. मी कुणाला घाबरत नाही. मी देशासाठी काम करत राहणार, असेही फ्लेचर पटेल यांनी म्हटले. लेडी डॉनचा काय संबंध आहे? ही लेडी डॉन कोण आहे? हे रॅकेट काय आहे? लेडी डॉनच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे का?, असा सवाल त्यांनी केला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App