वृत्तसंस्था
चेन्नई – काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांनी मच्छिमांरासोबत समुद्रात मारलेल्या डुबक्या तामिळनाडू – केरळच्या निवडणूकीत गाजल्या होत्या. असल्या डुबक्या मारून त्यांचा काँग्रेस पक्ष दोन्ही राज्यांच्या निवडणूकांमध्ये तरला नाही. Fishermen carry Tamil Nadu Minister Anitha Radhakrishnan on shoulders after he refuses to step into the water during an inspection at Thiruvallur district where fishermen had complained of erosion
पण तामिळनाडूत जो पक्ष सत्तेवर आला आहे, त्या द्रमूकशी त्यांची राजकीय मैत्री आहे. त्याच द्रमूकच्या मंत्र्यांनी राहुल गांधीच्या पुढचे पाऊल टाकले आहे. त्यांनी मच्छिमारांबरोबर पाण्यात ड़ुबकी मारली नाही… उलट आपले पांढरेशुभ्र बूट समूद्राच्या पाण्यात भिजू नयेत, म्हणून चक्क मच्छिमारांच्या कडेवर बसून त्यांनी किनारा गाठला आहे. तामिळनाडूत त्यावरून या मंत्र्यांवर टीकेची झोड उठली आहे.
अनिथा राधाकृष्णन हे या द्रमूकच्या मंत्र्यांचे नाव आहे. त्यांच्याकडे मत्स्य व्यवसाय, पशूधन खात्यांचा कारभार आहे. थिरूवल्लरू जिल्ह्यातील किनारपट्टीची धूप होते आहे. अशा तक्रारी तेथील मच्छिमारांनी केल्या होत्या. त्याची पाहणी करण्यासाठी मंत्री महोदय अनिथा राधाकृष्णन हे मच्छिमारांच्या बोटीत बसून समुद्रात पाहणी करायला गेले होते.
#WATCH | Fishermen carry Tamil Nadu Minister Anitha Radhakrishnan on shoulders after he refuses to step into the water during an inspection at Thiruvallur district where fishermen had complained of erosion. pic.twitter.com/55R7PTpk1j — ANI (@ANI) July 8, 2021
#WATCH | Fishermen carry Tamil Nadu Minister Anitha Radhakrishnan on shoulders after he refuses to step into the water during an inspection at Thiruvallur district where fishermen had complained of erosion. pic.twitter.com/55R7PTpk1j
— ANI (@ANI) July 8, 2021
परत येते वेळी ते बोटीतून उतरत असताना त्यांच्या लक्षात आले की आपले पांढरे शुभ्र बूट पाण्यात भिजतील. त्यांनी बोटीतून उतरायला नकार दिला. त्यांनी बोट अगदी कोरड्या किनारपट्टीवर घेऊन चलण्याचे आदेश दिले. पण बोट तशी कोरड्या किनाऱ्यावर येऊ शकत नव्हती. त्यामुळे मच्छिमारांनी मंत्री महोदयांचा जड देह आपल्या कडेवर उचलून किनाऱ्यावर आणला.
या घटनेचा विडिओ तामिळनाडूतच नव्हे, तर संपूर्ण देशात भरपूर व्हायरल झाला. त्यामुळे द्रमूक पक्षावर, मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यावर आणि मंत्री अनिथा राधाकृष्णन यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. आता त्यांच्यावर मुख्यमंत्री स्टॅलिन काय कारवाई करतात याकडे तामिळनाडूतील लोकांचे लक्ष लागले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App