शेतकरी आंदोलनात “मिसिंग” एक महत्त्वाचा घटक कोणता?


  • मोदींशी लढताना विरोधकांची स्ट्रॅटेजी जुनी, राजकीय हत्यारेही जुनी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनाचा देशा – परदेशात भरपूर बोलबाला असला तरी त्यात “मिसिंग” असलेल्या एका घटकाविषयी कोणी फारसे बोलताना आढळत नाही. किंबहुना त्याकडे बहुतेकांचे दुर्लक्षच झालेले दिसते आहे. तो घटक कोणता आणि त्याचे महत्त्व काय आहे, हा घटक आहे महिला…!! शेतकरी महिला कोठेही आंदोलनात दिसत नाहीत. farmers agitation women entities are missing

  • सगळ्या बातमीदारांनी, विश्लेषकांनी, अभ्यासकांनी या घटकाकडे दुर्लक्ष केले आहे, एवढेच नव्हे, तर आंदोलनाच्या आयोजकांनीही त्याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते.
  • याचा बारकाईने विचार केल्यास पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश येथील शेती, शेतकरी समाज यांच्या पुरूषप्रधान जखडी व्यवस्थेवर देखील झगझगीत प्रकाश पडतो. आंदोलकांनी महिलांना त्यांच्या आंदोलनातला स्वतंत्र घटक म्हणून देखील गृहीत धरलेले दिसत नाही.
  • शाहीनबागी आंदोलनात आंदोलकांनी स्ट्रॅटेजी म्हणून मुस्लिम महिलांना पुढे केले होते. त्यांचा आंदोलनकर्त्यांनी बफर म्हणून वापर केला आणि महिलांनी तो करवूनही घेतल्याचे स्पष्ट दिसत होते.
  • शेतकरी आंदोलनात ही स्ट्रॅटेजी बदलल्याचे दिसते आहे. पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेश अर्थात हरित प्रदेशातील बडे शेतकरी या आंदोलनाचे महत्त्वाचे घटक आहे. त्यांची स्ट्रॅटेजी श्रीमंत शेतकऱ्यांचे राजकीय पक्ष काँग्रेस, अकाली दल वगैरे ठरवत आहेत.


  • आंदोलनात शाहीनबागी, खलिस्तानी एलिमेंटची घुसखोरी झालेली आहेच. पण त्यांच्या शेतकरी स्ट्रॅटेजीत महिलांना स्थान दिलेले दिसत नाही.

  • पंजाब, हरियाणा, हरित प्रदेशात महिलांचा शेतीत सहभाग मोठा आहे. तो शेतीच्या प्रत्यक्ष कामात आहे. शेती अर्थव्यवस्थेत पुरूषप्रधान व्यवस्थेने त्यांना स्थान दिलेले नाही. त्याचेच प्रतिबिंब आंदोलनात पडलेले दिसते.
  • मोदी सरकारच्या योजना, धोरण व्यवस्थेत सर्व महिलांना स्वतंत्र एन्टीटी म्हणून स्थान आहे. सरकारी योजनांचा सर्वांत मोठा लाभार्थी घटक महिला असल्याचे विविध सर्वेक्षणातून पुढे आले आहे.

farmers agitation women entities are missing

  • या पार्श्वभूमीवर मोदी सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलनाचे हत्यार बनवून लढणारे पक्ष जुन्याच स्ट्रॅटेजीने जुनीच राजकीय हत्यारे घेऊन लढताना दिसत आहे.
  • ही साधारण निरीक्षणे आहेत.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात