पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी अयोध्येत रामंदिराच्या भूमिपूजन झाले होते. त्यानंतर मंदिर बांधकामाच्या हालचाली वेगाने सूरु झाल्या आहेत.
विशेष प्रतिनिधी
लखनौ : अयोध्येमध्ये श्री रामाचे भव्य मंदिर बांधण्यासाठी सुमारे १,१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. ते साडेतीन वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी ट्विट करून दिली. Expenditure of Rs. 1100 crore for Ayodhya Ram Temple
अयोध्या ही रामाचीच आहे, असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर रामभक्तात आनंदाची लाट पसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काही महिन्यांपूर्वी अयोध्येत रामंदिराच्या भूमिपूजन झाले होते. त्यानंतर मंदिर बांधकामाच्या हालचाली वेगाने सूरु झाल्या आहेत. अनेकांनी मंदिरासाठी देणग्या देण्यास सुरुवात केली आहे. देश आणि जगभरातून या मंदिराबाबत मोठी उत्सुकता आहे.
मंदिर संकुलाच्या मुख्य संरचनेसह सुमारे १,१०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असून ते साडेतीन वर्षांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे मजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट, कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरीजी महाराज यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App