Emergency Kangana Ranaut : आणीबाणी, कंगना राणावत आणि किस्सा कुर्सी का!!


झाशीची राणी, जयललिता यांच्यावरचे यशस्वी बायोपिक देणाऱ्या कंगना राणावतचा नवीन सिनेमा येतोय “इमर्जन्सी”… सध्या तो सोशल मीडियावर तो ट्रेडिंगला आहे. यामध्ये कंगना राणावत दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींनी घेतलेले वादग्रस्त निर्णय आणि इंदिरा गांधींचे एकूण व्यक्तिमत्व या भोवती हा सिनेमा गुंफलेला आहे. या सिनेमाचा पहिला लूक आणि व्हिडिओ जारी झाला त्याच्यावर लाईक्सचा प्रचंड पाऊस पडला. कंगना राणावतच्या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता दिसली आहे. पण आणीबाणी या विषयावरचा किंबहुना आणीबाणी या वादग्रस्त पार्श्वभूमीवर असलेला हा काही पहिलाच सिनेमा नाही. नजीकच्या भूतकाळात “इंदू सरकार” बनला होता. त्याच्या बराच आधी संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांचा “आंधी” गाजला होता.Emergency : kangana ranaut and story of kissa kursi ka movie

गुडगाव मध्ये प्रिंट जाळल्या

पण प्रत्यक्ष आणीबाणीच्या काळात अशाच एका सिनेमाबद्दल त्यावेळच्या मीडियामध्ये वाद रंगला होता आणि त्या वेळच्या सरकारने त्यावर बंदी घातली होती, तो सिनेमा म्हणजे “किस्सा कुर्सी का”. शबाना आजमी, राज किरण सुरेखा सिक्री आदींच्या त्यामध्ये भूमिका होत्या. आणि तो बनविला होता अमृत नहाटा या काँग्रेसच्याच खासदारांनी. एक प्रकारे सत्ताधारी पक्षाचे ते विडंबन होते. परंतु सेंन्सॉर मध्येच हा सिनेमा अडकून पडला. वाद एवढा विकोपाला गेला की सिनेमाच्या प्रिंट हरियाणातील गुडगाव मध्ये आणून जाळल्या होत्या.



 विद्याचरण शुक्ल – शबाना आजमी

त्यावेळी इंदिरा गांधी सरकारमध्ये विद्याचरण शुक्ल हे नभोवाणी मंत्री होते त्यांनी हा सिनेमा अडवून धरला. सुरुवातीला या सिनेमात बरीच काटछाट करायला लावली आणि नंतर देखील तो सिनेमा प्रदर्शित होऊ दिला नाही. त्यावेळी विद्याचरण शुक्ल आणि शबाना आजमी यांच्या विशेष जवळकीच्या चर्चा मीडियामध्ये आणि दिल्लीच्या राजकीय वर्तुळात बऱ्याच चवीने चर्चिल्या गेल्या होत्या. अर्थात तो सिनेमा थेट आणीबाणी वरचे भाष्य करणारा नव्हता पण त्या मुद्द्यावर बोट ठेवणारा जरूर होता. ते देखील सरकारला आवडलेले होते नव्हते.

 “किस्सा कुर्सी का” इंदिरा सरकारने दडपला

आज जेव्हा कंगना राणावत इमर्जन्सी या विषयावर सिनेमा बनवते आहे, तेव्हा तिच्या विचारसरणीला अनुकूल असलेले सरकार अस्तित्वात आहे किंबहुना सध्याच्या सरकारला अनुकूल असलेली तिची विचारसरणी असल्याने इमर्जन्सी सिनेमा मध्ये तसा अडथळा येण्याची शक्यता कमी आहे. त्याचवेळी सोशल मीडियाच्या आजच्या जमान्यात या अडथळ्यांना कोणी जुमानणारे नाही. परंतु “किस्सा कुर्सी का”च्या वेळी सोशल मीडिया अस्तित्वात नव्हता. जो मीडिया होता तो सरकारच्या पंजाखाली दडपला गेला होता. त्यामुळे “किस्सा कुर्सी का” त्यावेळी प्रदर्शित होऊ शकला नाही.

जिद्दीने सिनेमा परत बनवला

आणीबाणी नंतर अमृत नहाटांनी तो सिनेमा जिद्दीने परत बनवला. हेच ते अमृत नाहटा आहेत, जे आधी काँग्रेसचे खासदार होते. परंतु 1977 मध्ये त्यांनी जनता पक्षात प्रवेश करून ते पुन्हा खासदार बनले. जिद्दीने परत बनवलेला “किस्सा कुर्सी का” त्यांनी 1978 मध्ये प्रदर्शित केला. तो काही काळ चालला. पण तो सुपर डुपर हिट ठरला नाही, ही देखील वस्तुस्थिती आहे. कंगनाच्या “इमर्जन्सी”च्या निमित्ताने “किस्सा कुर्सी का” सिनेमाची आठवण झाली इतकेच!!

Emergency : kangana ranaut and story of kissa kursi ka movie

महत्वाच्या बातम्या 

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात