एलन मस्क यांनी ट्विटरच्या नव्या भारतीय सीईओचे केले अभिनंदन, म्हणाले – अमेरिकेला भारतीय टॅलेंटचा खूप फायदा झाला!

Elon Musk congratulates new Indian CEO of Twitter, says - US has benefited a lot from Indian talent

Elon Musk : ट्विटरने भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांना सीईओ बनवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. स्ट्राइपचे सीईओ आणि सह-संस्थापक पॅट्रिक कॉलिसन यांच्या ट्विटला उत्तर देताना एलन मस्क यांनी लिहिले की, अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा खूप फायदा झाला आहे. Elon Musk congratulates new Indian CEO of Twitter, says – US has benefited a lot from Indian talent


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : ट्विटरने भारतीय वंशाच्या पराग अग्रवाल यांची नवीन सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी त्यांना सीईओ बनवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले आहे. स्ट्राइपचे सीईओ आणि सह-संस्थापक पॅट्रिक कॉलिसन यांच्या ट्विटला उत्तर देताना एलन मस्क यांनी लिहिले की, अमेरिकेला भारतीय प्रतिभेचा खूप फायदा झाला आहे.

पॅट्रिक कॉलिसन यांनी पराग अग्रवाल यांचे अभिनंदन करताना लिहिले, “Google, Microsoft, Adobe, IBM, Palo Alto, Networks आणि आता Twitter चे CEO भारतातच लहानाचे मोठे झाले आहेत. तंत्रज्ञानाच्या जगात भारतीयांचे आश्चर्यकारक यश पाहून आनंद झाला. परागचे अभिनंदन.”

जगातील अनेक बड्या कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे सीईओ आहेत. मायक्रोसॉफ्टमध्ये सत्या नाडेला, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटमध्ये सुंदर पिचाई, अॅडोबमध्ये शंतनू नारायण, आयबीएममध्ये अरविंद कृष्णा, व्हीएमवेअरमध्ये रघुराम यांच्यानंतर पराग अग्रवाल आता ट्विटरचे सीईओ बनले आहेत.

आयआयटी बॉम्बेमध्ये शिक्षण

आयआयटी बॉम्बेमध्ये शिकलेल्या पराग अग्रवालने स्टॅनफोर्ड विद्यापीठातून डॉक्टरेटही केली आहे. 2018 मध्ये, Twitter ने अॅडम मेसियरच्या जागी मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती केली. ट्विटरच्या आधी परागने मायक्रोसॉफ्ट रिसर्च आणि याहूमध्येही काम केले होते.

या दिग्गज टेक कंपन्यांत भारतीय प्रमुख

मायक्रोसॉफ्ट – सत्या नाडेला
अल्फाबेट – सुंदर पिचाई
अडोबी – शांतनु नारायण
आयबीएम – अरविंद कृष्णा
मायक्रोन टेक्नॉलॉजी – संजय मेहरोत्रा
पालो ऑल्टो – निकेश अरोडा
व्हीएम वेअर – रंगराजन रघुराम
अरिस्टा नेटवर्क्स – जयश्री उल्लाल
ट्वीटर – पराग अग्रवाल
नेटअॅप – जॉर्ज कुरियन

Elon Musk congratulates new Indian CEO of Twitter, says – US has benefited a lot from Indian talent

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात