मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता खऱ्या अर्थाने आपल्याच “सत्तेची धग” लागलेली दिसते आहे. एकीकडे शिवसेनेच्या सत्तेची आणि मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्षे पूर्ण होताना राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना नेत्यांना कचाट्यात पकडले आहे. निधी वाटपा पासून ते शिवसेनेच्या खासदारांच्या मतदारसंघांवर “डल्लामार” कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. तर दुसरीकडे ईडी आता थेट उद्धव ठाकरे यांच्या घरात घुसली आहे…!!ED Uddhav Thackeray: Will Uddhav Thackeray save his house from the controversy of ED or will he save Shiv Sena leaders from the controversy of ED-NCP
तसे पाहिले तर ईडी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही मागे हात धुऊन लागली आहे. नवाब मलिक, अजित पवार, अजित पवारांच्या बहिणी आधीच ईडीच्या स्कॅनर खाली आहेत. जितेंद्र आव्हाड लवकरच ईडीच्या स्कॅनर खाली येण्याची शक्यता आहे. म्हणूनच त्यांनी सावध भूमिका घेत आपण आपल्या मुलीला महाराष्ट्रात ठेवणार नाही, असे सांगून टाकले आहे.
पवार “अविचल”
पण हे सगळे होत असताना स्वतः शरद पवार मात्र “अविचल” आहेत. सूडबुद्धीने कारवाई अशी तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करण्याखेरीज त्यांनी दुसरे काही केलेले नाही. ईडीच्या तपासणीची अजून खुद्द पवारां पर्यंत येऊन पोहोचलेली नाही. भले लवासाचा निकाल त्यांच्याविरोधात गेलेला असो. त्यांच्यासह अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर हायकोर्टाने ताशेरे मारले असोत लवासा सिटीतले बांधकाम पाडत पाडण्याचे आदेश हायकोर्टाने दिलेले नाहीत. त्यामुळे स्वतः शरद पवारांना आपण कारवाईतून “वाचल्याचा” दिलासा मिळतो आहे. हा दिलासा मिळत असतानाच शरद पवारांनी आपला “मूळचा करेक्ट कार्यक्रम” म्हणजे शिवसेना पोखरणे याला प्राधान्य दिल्याचे दिसत आहे.
श्रीरंग बारणे यांना हैराण करण्याचा मनसूबा
पुणे जिल्ह्यातल्या मावळ लोकसभा मतदारसंघ पार्थ पवार या शरद पवारांनी “कवडीची किंमत नसलेल्या न ठेवलेल्या” नातवासाठी सोडण्यास शिवसेनेला भाग पाडण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाने तयारी चालवली आहेत. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यावर राष्ट्रवादीचा हा “डल्लामार कार्यक्रम” आहे…!! यासाठी खुद्द पवार कुटुंबियातील रोहित पवार यांनी देखील उडी घेतली आहे. शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना हर प्रकारे हैराण करण्याचे मनसूबे रचले जात आहेत. याचे कारण अजून सारख्या तपास संस्थांची “धग” थेट शरद पवारांपर्यंत येऊन न पोहोचल्याचे आहे…!!
श्रीधर पाटणकर यांची संपत्ती जप्त
पण त्याच वेळी ईडी आता थेट उद्धव ठाकरे यांच्या घरात घुसली आहे. उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. श्रीधर पाटणकरांना म्हणजे रश्मी ठाकरे यांच्या सख्ख्या बंधूंना केव्हाही अटक होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर आता उद्धव ठाकरे खऱ्या अर्थाने नेमकी कोणती भूमिका घेतात…?? ते आपल्या घराला ईडीच्या कचाट्यातून वाचवतात…?? की राष्ट्रवादीच्या कचाट्यातून शिवसेनेची विद्यमान लोकप्रतिनिधींना वाचवतात…??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे…!!
संजय राऊत यांच्या तोंडी तोफांच्या वाफा!!
उद्धव ठाकरे यांचे “लेफ्टनंट” संजय राऊत हे त्यांचे काम इमानेइतबारे करताना दिसत आहेत. ईडी सारख्या किंवा इन्कम टॅक्स सारख्या संस्थांची कायदेशीर कारवाई झाली की केंद्र सरकार विरुद्ध “सूडबुद्धीची कारवाई” अशी जुनी स्टेप रोज वाजवण्याचे काम ते चोख बजावतात. पण त्या पलिकडे जाऊन कोणतीही कायदेशीर कार्यवाही रोखण्याची ते हिंमत दाखवू शकत नाहीत. ईडीचा आणि इन्कम टॅक्सचा वरवंटा असाच फिरत राहिला तर निम्मे शिवसेना नेते त्यात गारद होण्याची दाट शक्यता आहे.
भावना गवळी, आनंदराव अडसूळ, प्रताप सरनाईक, अनिल परब ही ईडीच्या यादीतली पुढची नावे आहेत. पण आता या सगळ्यांना ओलांडून थेट उद्धव ठाकरे यांच्या घरात घुसल्याने ते त्यांचे प्राधान्य स्वतःचे घर वाचण्याकडे राहील…?? की ईडीच्या स्कॅनर खाली सापडलेल्या शिवसेना नेत्यांना वाचवण्याचे राहील…!!, हे सांगायला फार मोठ्या रॉकेट सायन्सचा अभ्यास करण्याची गरज नाही.
नवाब मलिक पवारांच्या पायाखाली
ईडीची कारवाई नवाब मालिकांवर झाल्यानंतर शरद पवार यांनी त्यांना “पायाखाली” घेतल्याच्या घेतल्याचे विश्लेषण वरिष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी केले आहे. पण या पलिकडे जाऊन पवारांनी आता राजकीयदृष्ट्या शिवसेना पोखरण्याचे पुढचे पाऊल टाकले आहे. खुद्द पवारांना रोखणारी किंवा अन्य तपास संस्थांची कारवाई होत नाही तोपर्यंत पवार शिवसेना पोखरणे सोडणार नाहीत.
कारण शिवसेना पोखरल्या शिवाय राष्ट्रवादीचे अस्तित्व राजकीय दृष्ट्या “मोठे” होत नाही. ही वस्तुस्थिती त्यांना माहिती आहे. हे खऱ्या अर्थाने त्यामुळेच सत्तेवर राहूनही आणि मुख्यमंत्री पद मिळूनही अवघ्या अडीच वर्षात शिवसेना ईडी आणि पवार या दोघांच्या कात्रीत सापडली आहे. त्यातून उद्धव ठाकरे आपली सुटका कशी करून घेतात…??, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
ईडीचे हात पवारांपर्यंत केव्हा पोहोचणार??
अर्थात पवार आज कितीही शिवसेना पोखरण्याचा मनसूबा राखून असले तरी खुद्द त्यांच्या पासून ईडी किंवा केंद्रीय तपास संस्था फार लांब राहतील ही शक्यता देखील फार कमी आहे. कारण ईडीचा वरवंटा थांबवायचा नाही हा निर्णय जर केंद्र सरकारने घेतला असेल तर पवार देखील त्याला पुरे न पडणारेच तोकडे नेतृत्व आहे…!! ही वस्तुस्थिती आहे. मराठी माध्यमांनी ती कितीही नाकारली, “पॉवरफूल खेळीच्या” बातम्या कितीही चालवल्या तरी पवारांच्या तोकड्या नेतृत्वाची वस्तुस्थिती लपत नाही…!! पवारांची “करणी”च तशी असेल तर ईडी त्यांच्यापासून लांब नाही ही वस्तुस्थिती आहे. राज्य शिखर बँकेचा घोटाळा अजून कायदेशीरदृष्ट्या “जिवंत” आहे…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App