मोदी – पवार भेटीच्या दुसऱ्याच दिवशी अनिल देशमुखांच्या घरांवर ED चे छापे; देशमुखांचा राजकीय बळी देण्यास पवार राजी…??

प्रतिनिधी

नागपूर – राज्यसभेचे खासदार शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतरही सक्तवसूली संचलनालय ED ची कारवाई थंड व्हायला तयार नाही. काल पवारांनी १०.३० च्या सुमारास मोदींची भेट घेतली. आज नागपूरातून त्याच सुमारास ED ने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या काटोल आणि वडविहिरा येथील घरांवर छापे घातल्याची बातमी आली. ED raids on residences of anil deshmukh in katol

१०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोपांवरून राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये या छाप्यांमुळे आणखी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. अनिल देशमुख यांच्या नागपूर जिल्ह्यातील काटोल वडविहिरा येथील निवासस्थानी ईडीने छापे घातले आहेत. यामध्ये आता ED च्या हाती काय माहिती समोर येते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

नागपूर जिल्ह्याच्या काटोल नरखेड तालुक्यातील वडाळी वडाविहिरा इथे अनिल देशमुख यांची वडिलोपार्जित काही जागा आणि घरे आहेत, त्यांच्यावर ED च्या अधिकाऱ्यांनी छापे घातले असून इथे शोध मोहीम सुरू केली आहे. यामध्ये त्यांच्या हाती कोणते दस्तावेज लागतात आणि नेमकी काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.पण या छाप्यांचे राजकीय टायमिंग फार महत्त्वाचे आहे. काल शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सकाळी १०.३० च्या सुमारास भेट घेतली होती. त्यानंतर अनिल देशमुखांच्या घरांवर छापे घातल्याची बातमी या भेटीचे २४ तास उलटायच्या आत आली. याचा अर्थ शरद पवारांनी अनिल देशमुखांना राजकीय बळीचा बकरा बनवा. पण पवार कुटुंबीयांमधल्या माणसांना सोडा असे पवारांनी सांगितले आहे काय, अशी शंका आता राष्ट्रवादीतलेच नेते आणि कार्यकर्ते घेऊ लागले आहेत.

ED raids on residences of anil deshmukh in katol

महत्त्वाच्या बातम्या